Saturday, January 22, 2022

नाबार्डचा मोठा निर्णय: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खरीप-रब्बी हंगामासाठी कर्ज देण्याचे निर्देश दिले जात असले तरी स्थानिक पातळीवर जिल्हा बॅंकेची काय अवस्था आहे हे पाहणे देखील महत्वाचे आहे. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणच्या जिल्हा मध्यवर्ती बॅंका ह्या डबघाईला आलेल्या आहेत.

अनेक बॅंक शाखा ह्या बंद असून कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. यामध्ये मात्र, शेतकरी हे कर्जापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे नाबार्ड म्हणजेच राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण उद्योग बॅंकेने पतपुरवठा सोसायट्यांना थेट कर्ज देण्यास मान्यता दिलेली आहे. यासंबंधीची माहिती शिखर बॅंकेचे प्रशासकीय मंडळाचे विद्याधर अनास्कर यांनी दिली आहे.

त्यामुळे अनेक दिवसांपासून कर्जाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.गावस्तरावर ना नाबार्डच्या बॅंक शाखा आहेत ना जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या. केवळ विविध कार्यकारी सेवा सोसायटी ह्या आजही गावस्तरावर आहेत. शेतकऱ्यांनी कर्ज पुरवठा करण्याची जबाबदारी ही केंद्र सरकारने नाबार्डवर सोपवलेली आहे. त्यामुळे नाबार्ड आता कमी व्याजदराने सोसायट्यांना कर्जपुरवठा करणार आहे.

त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून सोसायट्यांचे ठप्प असलेले व्यवहार पुन्हा सुरु होणार आहेत. जिल्हा बॅंकेतील व्यवहार ठप्प झाल्यानंतर सोसायट्यांमध्ये देखील मरगळ आली आहे. मात्र, नाबार्डच्या या निर्णयामुळे गावस्तरावरील सोसायट्यांच्या माध्यमातून कर्ज मिळणे शेतकऱ्यांच्याही सोईस्कर होणार आहे.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!