Monday, January 17, 2022

स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या खातेधारकांसाठी :हे’ नियम पुढील महिन्यापासून बदलणार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:एसबीआयने (SBI) IMPS, NEFT आणि RTGS हस्तांतरणासारख्या ऑनलाईन व्यवहारांसाठी एसबीआयचे नवीन नियम आणले आहेत. इंटरनेट बँकिंग वापर आणि डिजिटल बँकिंग अधिक सुरक्षित व सुकर होण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येत आहे.

फेब्रुवारी २०२२ पासून हा बदल लागू होत आहे.एसबीआयने याविषयी अधिकृत निवेदन दिले आहे. डिजिटल पद्धतीने केलेल्या 5 लाख रुपयांपर्यंतच्या आयएमपीएस व्यवहारांवर (उदाहरणार्थ, इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग आणि योनो) कोणतेही सेवा शुल्क आकारण्यात येणार नाही.

वापरकर्त्यांना इंटरनेट बँकिंग वापरण्यास आणि डिजिटल बँकिंग अधिक सुरक्षित व सुकर होण्यासाठी एसबीआयने हे पाऊल उचलले आहे.

फेब्रुवारी 2022 पासून नियमांत बदल

1) एसबीआय IMPS शुल्क : ऑनलाइन मोड

5 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर, इंटरनेट किंवा मोबाइल बँकिंगद्वारे केलेल्या कोणत्याही आयएमपीएस व्यवहारावर कोणतेही सेवा शुल्क किंवा जीएसटी (GST) आकारला जाणार नाही.

योनो ॲपद्वारे केलेल्या व्यवहारांचाही या सवलतीत समावेश आहे. जे ग्राहक योनो ॲपद्वारे व्यवहार करतात, त्यांना सेवा शुल्क आकारले जाणार नाही.

2) एसबीआय IMPS शुल्क: ऑफलाइन मोड

1,000 रुपयांपर्यंत: शुल्क नाही

1,000 रुपयांपेक्षा जास्त आणि 10,000 रुपयांपर्यंत: 2 रुपये सेवा शुल्क + जीएसटी

10,000 रुपयांपेक्षा अधिक आणि 1,00,000 रुपयांपर्यंत: 4 रुपये सेवा शुल्क + जीएसटी

1,00,000 रुपयांपेक्षा अधिक आणि 2,00,000 रुपयांपर्यंत: 12 रुपये सेवा शुल्क + जीएसटी

2,00,000 रुपयांपेक्षा अधिक आणि 5,00,000 रुपयांपर्यंत (नवीन स्लॅब) : 20 रुपये सेवा शुल्क + जीएसटी

3) एसबीआयसाठी NEFT सेवा शुल्क: ऑनलाइन मोड

एसबीआय कोणत्याही NEFT व्यवहारांवर, सेवा शुल्क वा कर हे दोन्ही आकारणार नाही. योनो ॲपसह इंटरनेट किंवा मोबाइल बँकिंगद्वारे जाणारे व्यवहार, जरी 2 लाख रुपयांपेक्षा जास्त असले तरी सेवा शुल्क किंवा जीएसटी आकारण्यात येणार नाही.

4) एसबीआयसाठी NEFT सेवा शुल्क: ऑफलाइन मोड

10,000 रुपयांपर्यंत: 2 रुपये सेवा शुल्क + जीएसटी

10,000 रुपयांपेक्षा अधिक आणि 1,00,000 रुपयांपर्यंत: 4 रुपये सेवा शुल्क + जीएसटी

1,00,000 रुपयांपेक्षा अधिक आणि 2,00,000 रुपयांपर्यंत: 12 रुपये सेवा शुल्क + जीएसटी

2,00,000 रुपयांपेक्षा अधिक: 20 रुपये सेवा शुल्क + जीएसटी

5) एसबीआयसाठी RTGS सेवा शुल्क: ऑनलाइन मोड

कोणत्याही RTGS व्यवहारावर कोणताही सेवा शुल्क किंवा जीएसटी आकारला जाणार नाही. योनो ॲपसह इंटरनेट किंवा मोबाइल बँकिंगद्वारे

व्यवहार केला तरी आणि हा व्यवहार 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असला तरी सेवा शुल्क आकारण्यात येणार नाही.

6) एसबीआयसाठी RTGS सेवा शुल्क : ऑफलाइन मोड

2,00,000 रुपयांपेक्षा अधिक आणि 5,00,000 रुपयांपर्यंत: 20 रुपये सेवा शुल्क + जीएसटी

5,00,000 रुपयांपेक्षा अधिक: 40 रुपये सेवा शुल्क + जीएसटी.

ताज्या बातम्या

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...

या आमदाराची जीभ घसरली! रस्ते कंगना राणौतच्या गालापेक्षा चांगले करणार

माय महाराष्ट्र न्यूज:अभिनेत्री कंगणा रणौतविषयी वादग्रस्त वक्तव्य करून काँग्रेस आमदार डॉ. इरफान अन्सारी वादात सापडण्याची शक्यता आहे. जामताडामधील रस्ते कंगना रणौतच्या गालापेक्षाही चिकने बनवले...
error: Content is protected !!