Monday, January 17, 2022

आमदार लहु कानडे संतापले:ती घटना लज्जास्पद, कलंक लावणारी, शासनाची बेअब्रू करणारी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून न घेतल्याने महिलेची रस्त्यावर प्रसुती झाल्याची कालची घटना लज्जास्पद, कलंक लावणारी, शासनाची बेअब्रू करणारी आहे.

आरोग्य केंद्राचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी यांना तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवा. घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा. अन्यथा, या आरोग्य केंद्राला मी स्वतः टाळे ठोकील. असे आमदार लहू कानडे यांनी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भागवत डोईफोडे यांना बजावले.

गुरुवारी पहाटे सहा वाजता सुमन अरुण शिंदे (वय ३०, रा. देवळाली प्रवरा) प्रसूतीसाठी आरोग्य केंद्रात आल्या. त्यांना परिचारिकेने तपासून, दिवस भरले नाहीत व रक्ताची कमतरता आहे. असे सांगून दाखल करून घेण्यास नकार घंटा वाजविली.

कडाक्याच्या थंडीत जड पावलांनी प्रसूती कळा घेऊन सुमन शिंदे बाहेर पडल्या. दवाखान्यात पासून तीनशे फूटावर गेल्यावर त्यांना पुन्हा प्रसूती कळा आल्या. रस्त्याच्या बाजूला परिसरातील महिलांनी साड्यांचा आडोसा करून, प्रसूती केली.

या महिलेची माजी खासदार तनपुरे व आमदार कानडे यांनी चौकशी केली.आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांची चूकच नाही. असे काल ठासून सांगणार्‍या तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गायकवाड यांनी आज तनपुरे व कानडे यांच्या समक्ष ‘प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला दाखल करून,

निगराणीखाली ठेवणे गरजेचे होते. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करून, निर्णय घेणे गरजेचे होते. याप्रकरणी चूक झाली.’ अशी कबुली दिली. त्यामुळे घटनेतील दोषींना पाठीशी घालत असल्‍याचे निष्पन्न झाले.

ताज्या बातम्या

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...

या आमदाराची जीभ घसरली! रस्ते कंगना राणौतच्या गालापेक्षा चांगले करणार

माय महाराष्ट्र न्यूज:अभिनेत्री कंगणा रणौतविषयी वादग्रस्त वक्तव्य करून काँग्रेस आमदार डॉ. इरफान अन्सारी वादात सापडण्याची शक्यता आहे. जामताडामधील रस्ते कंगना रणौतच्या गालापेक्षाही चिकने बनवले...
error: Content is protected !!