Tuesday, January 18, 2022

नात्यातील समाधानासाठी किती वेळा सेक्स करायला हवा? वाचा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या साथीचा ताण लोकांच्या केवळ शरीरावरच नाही, तर मनावरही आहे. यामुळे अनेक कौटुंबिक नात्यांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. इतकेच नाही तर लोकांच्या सेक्स लाइफवरही  त्याचा फार मोठा परिणाम झाला आहे.

तज्ञांच्या मते, या साथीमुळे लोकांमध्ये वाढलेल्या तणावामुळे त्यांची लैंगिक इच्छा कमी होत आहे. अशा परिस्थितीत, अनेक जोडप्यांमध्ये एक मोठा प्रश्न निर्माण झाला की ते पुन्हा एक चांगले लैंगिक जीवन सुरू करू शकतात का? तज्ञांचा असा

विश्वास आहे की, एक चांगले आणि समाधानी लैंगिक जीवन सुरू करण्यासाठी जोडप्यांना आठवड्यातून एकदा सेक्स केला पाहिजे.अमेरिकन असोसिएशन ऑफ मॅरेज अँड फॅमिली थेरपिस्टचे क्लिनिकल फेलो आणि सेक्स थेरपिस्ट इयान कर्नर यांच्या म्हणण्यानुसार,

आठवड्यातून एकदा सेक्स करणारे लोक सर्वात आनंदी असतात आणि ते आपल्या नात्यामध्येही समाधानी असतात. गरोदरपणाबाबतच्या एका पॉडकास्ट दरम्यान, कर्नरने रिलेशनशिप एक्सपर्टसह लोकांच्या लैंगिक संबंधांबद्दल संभाषण केले. यात त्यांनी जोडप्यांना

त्यांच्या लैंगिक जीवनातील अडथळे व तणाव कसा दूर करता येईल हे सांगितले. विशेषत: ज्या जोडप्यांनी पालक बनण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांच्यासाठी या टिप्स उपयुक्त होत्या.सोशल सायकोलॉजी अ‍ॅण्ड पर्सॅलिटी सायन्स या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या

संशोधनानुसार, आठवड्यातून एकदा सेक्स करणारी जोडपी ही, त्यापेक्षा कमी सेक्स करणाऱ्या जोडप्यांपेक्षा समाधानी असल्याचे आढळले होते. आठवड्यातून एकापेक्षा जास्त वेळा सेक्स केल्यामुळे नात्यात काही फरक पडलेला संशोधकांना आढळले नाही.

कर्नर म्हणाले की, सेक्स तीन प्रकारचा असतो. केवळ मनोरंजनासाठी होणारा, आपल्या जोडीदारासह नाते मजबूत करणारा आणि कौटुंबिक नियोजन करण्यासाठी केला जाणारा. तिन्ही प्रकारच्या सेक्सची स्वतःची महत्त्वपूर्ण भूमिका असते.

अशा परिस्थितीत कोणत्याही फक्त एक प्रकारच्या सेक्सवर लक्ष केंद्रित केल्यास जोडप्यांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो आणि हळूहळू लैंगिक इच्छा कमी होऊ लागते. यासाठी जोडप्यांनी तीनही प्रकारच्या सेक्सचा आनंद घ्यायला हवा.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!