Thursday, January 20, 2022

जलसंधारण मंत्री गडाख म्हणाले मी अहमदनगर जिल्ह्याचा भूमीपूत्र असल्याने….

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी अहमदनगर जिल्ह्यातील 274 बंधारे दुरुस्तीसाठी 52 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.आज पारनेर तालुक्यातील पठारवाडी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन मंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते झाले.

या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी माजी आमदार विजय औटी, शिवसेनेचे दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रा. शशिकांत गाडे, काशिनाथ दाते, संदेश कार्ले, रामदास भोसले, किसनराव सुपेकर आदी उपस्थित होते.

शंकरराव गडाख म्हणाले, अहमदनगर जिल्ह्यातील 3 ते 4 तालुके अतिशय दुष्काळी आहेत. यात तालुक्यांत पारनेर व नगर तालुक्याचा समावेश होतो. या तालुक्यांत फार पूर्वीच्या काळचे बंधारे आहेत. ते 10 ते 30 वर्षांपासून नादुरूस्त होते. काही बंधारे

तर शिवकालीन व इंग्रजकालीन आहेत. हे बंधारे दुरुस्त करण्याची गरज होती. यासाठी मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेच्या माध्यमातून एक नवीन योजना आपण आणली आहे.ते पुढे म्हणाले की, 10 किंवा त्यापेक्षाही जास्त वर्षांपूर्वीचा तलाव, बंधारा दुरुस्त होणार आहे.

मी अहमदनगर जिल्ह्याचा भूमीपूत्र असल्याने धडक कार्यक्रम हाती घेतला. 1100 तलाव, बंधाऱ्यांचे सर्वेक्षण केले. मला कोविडपूर्वीच सहा महिन्यांत बंधारे दुरुस्ती करायची होती. पण दुर्दैवाने कोविड आल्याने राज्य सरकारचे आर्थिक स्त्रोत मंदावले.

त्यामुळे विकासकामे करता येत नव्हती. कोविड परिस्थिती अटोक्यात आल्यावर या कामाला वेग दिला. 1100 बंधाऱ्यांचे सर्वेक्षण केले. शासनाकडे बंधारे दुरूस्तीचा प्रस्ताव पाठविण्यात आला असे गडाख म्हणाले.नगर जिल्ह्यातील सर्वाधिक निधी पारनेर तालुक्याला दिला आहे.

एकही बंधारा नादुरुस्त राहणार नाही. पुढील काळात अशी विधायक कामे होण्यासाठी विजय औटी, काशिनाथ दाते, सुपेकर यांच्या बरोबर हातात हात घेऊन काम करायचा प्रयत्न करावा, असे आवाहनही यावेळी मंत्री गडाख यांनी केले.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!