Thursday, October 5, 2023

फिर्यादिनेच केला ७ लाख रुपये लुटीचा बनाव

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

तालुक्यातील पाचेगाव येथील व्यक्तीने सात लाख रुपये लुटीचा बनाव स्थानिक गुन्हे शाखेने उघडकिस आणला असून तक्रारदारानेच हा बनाव केल्याची कबुली दिली आहे.

याबाबतची अधिक हकिगत अशी की, फिर्यादी श्री. संदीप गणपतराव फुगे, (वय ३८वर्षे) रा. पाचेगांव शिवार, ता. नेवासा याने बँकेतुन होमलोन मंजुर झालेली ७,००,०००/- रुपये रोख रक्कम काढुन ती कापडी पिशवीत ठेवुन मोटार सायकलचे हॉडेलला लावुन टाकळीभान ते पाचेगांव रस्त्याने घरी जात असताना काळे रंगाचे मोटार सायकलवर आलेल्या अनोळखी दोन इसमांनी फिर्यादीची मोटार सायकल आडवुन चाकुचा धाक दाखवुन नमुद रोख रक्कम बळजबरीने चोरुन नेली. सदर घटने बाबत फिर्यादी यांनी नेवासा पोलीस स्टेशन गु.र.नं. ४५० / २०२३ भादविक ३९२, ४२७ प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला होता.

सदरची घटना घडल्यानंतर पोलीस अधीक्षकराकेश ओला यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोनि दिनेश आहेर यांना स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमुन गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेश दिले होते.
त्या प्रमाणे पोनि दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि गणेश वारुळे, पोहेकॉ मनोहर गोसावी, दत्तात्रय हिंगडे, विश्वास बेरड, देवेंद्र शेलार, पोना ज्ञानेश्वर शिंदे, संदीप दरंदले, रवि सोनटक्के, भिमराज खर्से, योगेश सातपुते, चापोहेकॉ उमाकांत गावडे व संभाजी कोतकर अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करुन सदर गुन्हा उघडकिस आणणे बाबत सुचना देवुन पथकास लागलीच रवाना केले. पथक नेवासा परिसरात फिरुन आरोपींची माहिती घेत असताना पोनि आहेर यांनी घटना ठिकाणास भेट देवुन फिर्यादीकडुन घटनेची माहिती घेत असताना फिर्यादी हा विसंगत माहिती सांगत असल्याचे निदर्शनास आल्याने पोनि दिनेश आहेर यांनी स्थागुशा पथकास घटना ठिकाणचे व आजुबाजूचे सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तपास करणे तसेच फिर्यादी संदीप फुगे यास विश्वासात घेवुन आरोपी व त्यांनी गुन्हा करताना वापरलेले वाहन या बाबत अधिक चौकशी करुन पुढील तपास करणे बाबत मार्गदर्शन केले. त्या प्रमाणे पथकाने फिर्यादीकडे कौशल्याने तपास करुन सखोल व बारकाईने विचारपुस करता त्याने मी लोकांकडुन उसनवार घेतलेले पैसे बुडविण्यासाठी बँकेतुन काढलेली ७,००,०००/- रुपये रोख रक्कम घरी नेवुन ठेवली व त्यानंतर रस्तालुट झाल्याचा बनाव करुन नेवासा पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली अशी कबुली दिल्याने आरोपी नामे संदीप गणपतराव फुगे, वय ३८, रा. पाचेगांव, ता. नेवासा यास ७,००,०००/- रुपये रोख रक्कम त्याचे राहते घरातुन हस्तगत करुन त्यास ताब्यात घेवुन नेवासा पोस्टे येथे हजर केले. पुढील तपास नेवासा पोस्टे करीत आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती. स्वाती भोर , उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

 

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!