Friday, January 21, 2022

नगर जिल्ह्यातील घटना: विवाहित महिलेच्या घरात ‘तो’ अश्लील मजकुराच्या चिठ्ठ्या टाकायचा, पतीला कळताच…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील मडकी गावात एक विवाहित पुरुष एका विवाहित महिलेच्या घरात अश्लील मजकूर लिहिलेल्या चिठ्ठ्या टाकायचा. एकदा तिने त्याला खिडकीतून चिठ्ठी टाकताना

पाहिले आणि आपल्या पतीला सांगितले. पती त्या पुरुषाकडे विचारणा करण्यासाठी गेले असा त्याने, त्याच्या पत्नीने या पीडित दाम्पत्यावरच हल्ला केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.हल्ला करणाऱ्या आणि धमकी देणाऱ्या तिघांविरुद्ध

नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवृत्ती भानुदास वरकड, भरत वरकड व एक महिला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी यातील फिर्यादी महिलेस आणि तिच्या पतीला शिवीगाळ करून

जीवे मारण्याची धमकी दिल्याचा तसेच हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्वजण एकाच गावातील आणि जवळच राहणार आहेत.नेवासा तालुक्यातील मडकी गावात हे दाम्पत्य राहते. गेल्या चार-पाच महिन्यांपासून

महिलेच्या घरात अश्लील मजकूर लिहिलेल्या चिठ्ठ्या येत होत्या. याचा त्या महिलेला त्रास होत होता. एक दिवस खिडकीतून चिठ्ठी टाकताना महिलेने निवृत्ती मरकड याला पाहिले. तो आधीपासूनच महिलेवर वाईट नजर ठेवून होता. त्यानेच चिठ्ठी टाकल्याची खात्री झाल्यावर महिलेने हा प्रकार पतीला सांगितला.

त्यांनी वरकड याच्या घरी जाऊन यासंबंधी विचारणा केली. याचा राग येऊन त्याने हातात खोरे घेऊन अंगावर धावून आला. तर भारत वरकड हातात काठी घेऊन मारण्यासाठी धावला. या दाम्पत्यास शिवीगाळ केली. मारहाण करण्यासाठी त्यांच्या अंगावर हे सर्वजण धावून गेले. जीवे मारण्याची धमकीही दिली.

त्यांच्या तावडीतून सुटका करून घेत दाम्पत्याने पोलिस ठाणे गाठले. तेथे पोलिसांना घडला प्रकार सांगितला. यासंबंधी पीडित महिलेच्या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!