Thursday, January 20, 2022

नगर जिल्हा ज्या शेतकऱ्याचा खूनाने हादरला त्या खून करणाऱ्या दोघा भावांना अखेर….

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात शेतीच्या पाट पाण्याच्या वादातून ज्ञानेश्‍वर नागरगोजे (रा. भातकुडगाव ता. शेवगाव) या शेतकऱ्याचा खून करणाऱ्या चित्तरंजन रामचंद्र घुमरे (वय 31) व प्रियरंजन रामचंद्र घुमरे

(वय 35 दोघे रा. भातकुडगाव, ता. शेवगाव) या दोघा सख्या भावांना जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी पाच हजार रूपये दंड अशी शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. एम. पाटील यांनी ठोठावली आहे.

ज्ञानेश्‍वर नागरगोजे हे भातकुडगाव (ता. शेवगाव) येथे आई-वडिलांसोबत राहून शेती करत होते. त्यांच्या मामाचा मुलगा वैभव हरिभाऊ सानप (रा. सौताडा, ता. पाटोदा, जि. बीड) हा भातकुडगाव येथे शेती कामाच्या मदतीसाठी आला होता. ता. 5 मार्च 2020 रोजी

रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास ज्ञानेश्‍वर व वैभव हे पिकाला पाणी देण्याठी शेतात गेले होते. ज्ञानेश्‍वर यांनी शेजारील चित्तरंजन व प्रियरंजन घुमरे यांच्या शेतजवळील पाटपाण्याच्या चारीचे पत्राचे गेट उघडल्यानंतर रात्री 11 वाजेच्या सुमारास सामनगाव

चौफुलीवर मुळा चारीच्या पाटावर आले. त्याठिकाणी चित्तरंजन व प्रियरंजन हे दुचाकीवरून आले. “आमच्या शेताजवळील चारीचे पत्राचे गेट का काढले ?’ असे म्हणून शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरूवात केली. ज्ञानेश्‍वर या मारहाणीत

सुमारे 10 फुट उंचीवरून खाली डोक्‍यावर पडला. त्यांच्या मानेला व डोक्‍याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर घुमरे बंधू तेथून पळून गेले. वैभवने परिसरातील शेतकऱ्यांच्या मदतीने ज्ञानेश्‍वरला उपचारासाठी शेवगाव येथील एका खासगी रूग्णालयात दाखल केले.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!