Friday, January 21, 2022

तुम्ही अंडी फ्रीजमध्ये ठेवतात ?तर ही अत्यंत महत्त्वाची बातमी वाचाच

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अंडी हा अनेकांच्या आहारातील महत्त्वाचा घटक आहे. अंडी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. आपण कधीही बाजारातून अंडी आणतो, ही अंडी उकडण्यापूर्वी कधीही फ्रीजमध्ये ठेवू नयेत, असे सांगितले जाते.

झी न्यूज आणि डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, ब्रिटनमधील मुख्य शेफ जेम्स मार्टिन यांनी अंड्याच्या या विषयाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी आपला मुद्दा सिद्ध करण्यासाठी दोन अंडी घेतली. यापैकी एक बदकाचे अंडे होते आणि दुसरे कोंबडीचे.

बदकांची अंडी फ्रीजमध्ये न ठेवता थेट उकडली, तर कोंबडीची अंडी फ्रीजमध्ये 2 ते 3 तास ​​ठेवल्यानंतर उकडली.जेम्स मार्टिन यांनी बदकाचे उकडलेले अंडे नंतर कापले तेव्हा ते योग्य प्रकारे तयार झाले होते. तर कोंबडीची अंडी कापली तर ती वाहू गेली.

दोन्हींच्या चव आणि फ्लेवरमध्येही मोठा फरक होता. त्यानंतर जेम्सने याबाबतचे कारण सांगितले ज्यामुळे दोन अंड्यांमध्ये हा फरक दिसला.जेम्सच्या म्हणण्यानुसार, जेव्हाही आपण अंडी फ्रीजमध्ये ठेवतो तेव्हा ती फ्रीजमध्ये ठेवलेल्या इतर वस्तूंचा वास आणि फ्लेवर

 शोषून घेतात. यामुळे त्यांच्यातील नैसर्गिक चव आणि फ्लेवर नाहीसा होतो. त्यामुळेच अंडी फ्रीजमध्ये चुकूनही ठेवू नका. त्याऐवजी, कोरड्या आणि थंड ठिकाणी अंडी साठवण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून त्यांच्यातील नैसर्गिक चव टिकून राहते.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!