Thursday, January 20, 2022

नगर जिल्ह्यात शंभर टक्के लसीकरण करणाऱ्या गावांना बक्षिसे

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना प्रतिबंधक लस घेण्याबाबत जनजागृती करण्यासाठी १०० टक्के लसीकरण झालेल्या गावांना बक्षीस योजना, अधिकारी-कर्मचाऱ्यांमार्फत दत्तक गाव योजना राबविली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.

जिल्ह्यात सध्या ८१ टक्के जणांनी लशीची पहिली मात्रा तर ५२ टक्के जणांनी दोन्ही मात्रा घेतल्या आहेत. एकूण ३६ लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी ६ लाख नागरिकांनी अद्याप लशीची एकही मात्रा घेतलेली नाही.

अशा नागरिकांचे ‘मॅपिंग केले जात आहे. त्यासाठी घरोघर सर्वेक्षण लस न घेणाऱ्या नागरिकांची यादी तयार करणे, लस घेतली असेल तरच सरकारी कार्यालयात प्रवेश करण्यास परवानगी दिली जाईल, आमदारांपासून ते ग्रामपंचायत सदस्य असणाऱ्या

लोकप्रतिनिधींपर्यंत लसीकरण न करणाऱ्यांचा शोध घेतला जाईल, यासाठी शिक्षक, मुख्याध्यापक, तलाठी, मंडळ अधिकारी यांना पर्यवेक्षण करण्यासाठी नियुक्त केले जाईल, असे त्यांनी सांगितले. लस घेतली नाही, तर योजनांचा लाभ मिळणार नाही, अशी भूमिका घेता येणार नाही.

नागरिकांच्या कायदेशीर हक्कावर गदा आणता येणार नाही. त्याऐवजी नागरिकांनीच उत्स्फूर्तपणे पुढे यावे, असे त्यांनी सांगितले.दरम्यान, विवाह समारंभाना मोठी गर्दी होत असते. अशी गर्दी टाळण्यासाठी आता विवाहाच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त नियुक्त केला जाणार आहे.

याबरोबरच प्रवासी वाहतूक वाहनांमध्ये गर्दी होत असते. अशा गर्दीच्या ठिकाणीही तपासणी केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिली.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!