Friday, January 21, 2022

इंदुरीकर महाराजांनी केलेल्या वक्तव्यावर गुन्हा दाखल करावा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:संपूर्ण महाराष्ट्रात समाजप्रबोधनकार समजले जाणारे अहमदनगर जिल्ह्यातील कीर्तनकार निवृत्ती देशमुख इंदुरीकर महाराज हे नव्या वादात अडकले आहेत. पुन्हा त्यांनी कोरोनावर वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

या वक्तव्यावरून भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी इंदुरीकर महाराजांवर कारवाई व्हावी अशी सरकारकडे मागणी केली आहे.तृप्ती देसाई म्हणाल्या की, मी माळकरी आहे म्हणून मला कोरोना होणार नाही आणि माळ काढणाऱ्यांना

कोरोना गाठणारचं असे सांगून कीर्तनाच्या माध्यमातून इंदुरीकर अंधश्रद्धा पसरवत आहेत. कोरोना ही महाभयंकर महामारी असून सध्या तिसरी लाट आपल्या देशात आहे. याआधी अनेक जणांना कोरोनामुळे मृत्यूला सामोरे जावे लागले आहे

तर अनेक जण मृत्यूच्या दारातून बाहेर आले आहेत, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातच सरकार सुद्धा जनजागृती करत आहेच, परंतु स्वतःला कीर्तनकार म्हणविणारे इंदुरीकर पुन्हा एकदा असे वक्तव्य करून अंधश्रद्धेला खतपाणी घालत आहेत.

त्यांनी पुढे म्हटल्या आहे की, सरकारमधील नेते आणि विरोधी पक्षातील नेते यांनी ठेवलेल्या प्रवचनाला इंदुरीकर यांना बोलविले जाते आणि गर्दी जमा होते, आता लवकरच निवडणुका आहेत केवळ म्हणूनच दरवेळी त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न

या सर्व नेत्यांकडून केला जातो. या आधी सुद्धा त्यांच्या कोरोनावरील वक्तव्यावर सरकारने कोणतीही कारवाई न करता सूट दिली होती परंतु हिम्मत असेल तर आणि आपल्या राज्यात सर्वांना कायदा समान असेल तरच या सरकारने इंदुरीकरांवर

त्यांनी केलेल्या वक्तव्यावर गुन्हा दाखल करावा. अन्यथा अंधश्रद्धा पसरवण्यात सरकारसुद्धा सामील आहे असे जनतेला वाटेल, असे तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!