Thursday, January 20, 2022

एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास पॅन, आधार कागदपत्रांचे काय करावे?वाचा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:जीवन आणि मृत्यू ही जीवनातील दोन कटू सत्ये आहेत ज्यातून प्रत्येकाला जावे लागते. अशा स्थितीत मृत्यूपासून कोणीही सुटू शकत नाही. तथापि, फार कमी लोकांना हे माहित असेल की, जर एखाद्या

व्यक्तीचा मृत्यू झाला तर, त्याच्या सरकारी कागदपत्रांचे जसे की, वोटर आय कार्ड, पासपोर्ट, पॅन कार्ड, आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्सचे काय करावे. आज आम्ही तुम्हाला याचबद्दल माहिती सांगणार आहोत.

पासपोर्ट ठेवा संभाळूनपासपोर्ट कायद्यांतर्गत, एकदा पासपोर्ट बनवला की, धारकाच्या मृत्यूनंतर तो रद्द करता येत नाही. त्याची कालमर्यादा संपली की, ती आपोआप अवैध होते. अशा परिस्थितीत गैरवापर करणाऱ्यांकडून पासपोर्टचा गैरवापर होऊ नये,

यासाठी पासपोर्ट धारकाच्या मृत्यूनंतर संबंधित व्यक्तीचा पासपोर्ट कुंबियांनी त्यांच्याकडे सुरक्षितपणे ठेवावा.मतदार ओळखपत्र रद्द करामतदार नोंदणी नियम, 1960 अंतर्गत मतदाराचा मृत्यू झाल्यास, त्याचे मतदार ओळखपत्र रद्द केले जावे.

असे केल्याने त्याचा गैरवापर होण्याची शक्यता कमी होते. यासाठी मृताच्या कायदेशीर वारसाला स्थानिक निवडणूक कार्यालयात फॉर्म क्रमांक 7 भरून द्यावा लागतो. या फॉर्मसोबत मृत्यू प्रमाणपत्राची छायाप्रतही जोडावी लागते.ड्रायव्हिंग लायसन्स

रद्द करामृत व्यक्तीच्या ड्रायव्हिंग लायसन्सबाबत प्रत्येक राज्यात वेगवेगळे नियम आहेत. मात्र, परवानाधारकाचा मृत्यू झाल्यास, वारसदार स्थानिक आरटीओ कार्यालयात जाऊन संबंधित मृत व्यक्तीचा वाहन चालविण्याचा परवाना रद्द करण्यासाठी अर्ज करू शकतो.

यानंतर आवश्यक बाबी तपासल्यानंतर मृत व्यक्तीचा परवाना रद्द केला जातो.मृत व्यक्तीचे पॅनकार्ड सरेंडर करापॅन कार्ड हे सर्वात महत्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. याशिवाय तुम्ही तुमची बँक खाती आणि डीमॅट खाती ऑपरेट करू शकत नाही किंवा इन्कम

टॅक्स रिटर्न (ITR) फाइल करू शकत नाही. अशा परिस्थितीत, पॅनकार्ड धारकाच्या मृत्यूनंतर, सर्वप्रथम त्याच्याशी जोडलेली सर्व खाती बंद करावी. त्यानंतर आयकर विभागाकडे अर्ज करून मृत व्यक्तीचे पॅनकार्ड सरेंडर करावे.आधार कार्ड लॉक करा

ओळख पत्राशी संबंधित कागदपत्रांमध्ये आधार कार्ड हे सर्वात महत्त्वाचे आहे. पेन्शन, शिष्यवृत्ती, एलपीजी सब्सिडी यासह सर्व योजना आधार क्रमांकाशी जोडलेल्या असतात. अशा परिस्थितीत, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, कुटुंबातील

 सदस्य mAadhaar अॅप किंवा UIDAI वेबसाइटद्वारे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे बायोमेट्रिक क्रेडेंशियल लॉक करू शकतात.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!