अहमदनगर/प्रतिनिधी
राज्य आणि राष्ट्र उभारणीसाठी प्रत्येक व्यक्तीला किमान तीन झाडे लावण्यासाठी प्रवृत्त करावे अशा सूचना नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानव विकास संस्थेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष सुयोग धस (श्रीगोंदा) यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानव विकास संस्थेच्या राष्ट्रीय व राज्यस्तरावरील कार्यकारी पदाधिकाऱ्यांचे ऑनलाइन सभेत श्री.धस बोलत होते.राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा.दीपक भवार, राज्य अध्यक्ष बादल बेले,अहमदनगर जिल्हा सचिव सुखदेव फुलारी, सचिन वाघ, निशा नाईक, सुनयना तांबेकर, आगाशे मॅडम, प्रदीप सावंत, प्रीती टोटवार, बबलू चव्हाण,शिवाजी पाटील,शुभांगी मॅडम,स्नेहलता मॅडमसुकन्या गवस,सुनिता सावंत,सुवर्णा दळवी,
तेजस्विनी मॅडम,उदय खरात, वैशाली यादव,ऋतुजा गवस,सौ. पल्लवी पवार, तृप्ती माने, गिरीश बांगर, निशा नाईक, प्रमोद वालुक्कर, शरद मोटे, अभिषेक पवार, अमोल गुंड,
अनिता कळस्कर, अनुप्रिता मॅडम, आकाश भोकसे, भावना पाटील गजानन मिरगे, मिताली साळुंखे, पूजा गावडे,पूजा बत्रा
आदि सहभागी झाले होते.
यावेळी २०२३ या वर्षामध्ये राबविण्यात येणारे उपक्रमाचे उपक्रम, संस्थेचे ध्येय धोरणे ठरविणे, कृती आराखडा तयार करणे, वार्षिक धोरण ठरवणे,सदस्य वाढ, नेतृत्व विकास, टीम मॅनेजमेंट, संपर्क वाढवणे, तालुका निहाय संस्थेचे जाळे उभे करून राज्य बांधणी करणे,त्याच बरोबर महिला सक्षमीकरण, वनसंवर्धन, वन्यजीव संरक्षण, गड किल्ले संवर्धन या विषयावर व्यापक चर्चा झाली.
तसेच भारता बाहेर इतर देशात ही संस्थेचे कार्य वाढीच्या दृष्टीने प्रयत्न करणे आदी विषयावर चर्चा झाली.