Saturday, January 22, 2022

WhatsApp सुरक्षित प्लॅटफॉर्म नाही या कंपनीने केलं अलर्ट

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:WhatsApp च्या नावाने एक मोठा घोटाळा समोर आला होता. WhatsApp वर Rediroff.ru नावाने फसवणुकीला सुरुवात झाली होती. या फिशिंग घोटाळ्याद्वारे फ्रॉडस्टर्स सोशल इंजिनियरिंग मेथडचा वापर करुन

वैयक्तिक आणि फायनेंशियल माहितीपर्यंत पोहोचत होते. फसवणूक करणारे सर्वात आधी युजरला WhatsApp वर लिंक पाठवतात. ज्यावेळी युजर लिंकवर क्लिक करतात, त्यावेळी नवं वेबपेज ओपन होतं. या वेबपेजमध्ये एक सर्व्हे करावा लागतो.

सर्व्हे करुन युजर चांगलं बक्षिस जिंकू शकतो असं सांगितलं जातं. या सर्व्हेमधून युजर्सची संपूर्ण माहिती स्कॅमर्सपर्यंत पोहोचते.सायबर सुरक्षा कंपनी कॅस्पर्सकीचे डायरेक्टर दिमित्री बेस्टुजेव यांनी सांगितलं, की WhatsApp मध्ये सुरक्षेबाबत

अनेक त्रुटी आहेत. WhatsApp वर युजर्सने आपली कोणत्याही प्रकारची पर्सनल माहिती शेअर करू नये.www.express.co.uk मध्ये प्रकाशित एका माहितीनुसार, दिमित्री बेस्टुजेवने स्पॅनिश न्यूज एजेन्सीला दिलेल्या

एका मुलाखतीत सांगितलं, की WhatsApp सुरक्षित प्लॅटफॉर्म नाही. फ्रॉडस्टर्स WhatsApp युजर्सच्या डेटावर नजर ठेवून असतात आणि मोठी संधी मिळतात त्याचा गैरवापर केला जातो.WhatsApp पासून इतर कोणत्याही सोशल मीडिया

प्लॅटफॉर्मवर खासगी माहिती शेअर करू नका. सायबर सिक्योरिटी एजेन्सीच्या प्रमुखाने दिलेल्या माहितीनुसार, फ्रॉडस्टर्ससाठी WhatsApp नवं नाही, जगभरातील मेसेजिंग सेवेच्या सुमारे 200 कोटी वापरकर्त्यांना लक्ष्य करणं हे फ्रॉडस्टर्सचं टार्गेट आहे.

त्यामुळे WhatsApp वर कोणतीही माहिती शेअर करू नका. कोणतीही अनोळखी लिंक ओपन करू नका.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!