Friday, January 21, 2022

पुन्हा संकट:मेघगर्जनेसह कोसळणार पाऊस, या जिल्ह्यांना इशारा….

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशात हवामानाची आंधळी कोशिंबीर सुरू आहे. देशात कुठे मेघर्जनेसह जोरदार पाऊस आणि गारपीट सुरू आहे. तर काही ठिकाणी थंडीचा कहर सुरू आहे. आज पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि झारखंडमध्ये

हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मध्य भारतात अनेक ठिकाणी मुसळधार पावसासह गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवला आहे.

खरंतर, पावसाळा ऋतू संपून दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटला आहे. असं असताना देखील महाराष्ट्रासह देशात अनेक ठिकाणी थंडीच्या लाटेसह अवकाळी पावसाचा कहर सुरू आहे. मागील चोवीस तासात धुळ्यातील किमान तापमान 3 अंशांनी

घसरलं असून याठिकाणी आज 7.6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. एकीकडे थंडीचा कहर सुरू असताना, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मात्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान खात्याने आज विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांना आज येलो अलर्ट जारी केला आहे. पुढील काही तासांतच याठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान वेगवान वारे वाहण्याची शक्यता आहे.

तसेच तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काल औरंगाबाद आणि अकोला जिल्ह्यांत अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस कोसळला आहे. याचा रब्बी पिकांना फटका बसत आहे. यामुळे मराठवाड्यासह विदर्भातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!