Tuesday, January 18, 2022

नगर ब्रेकिंग: लिफ्ट कोसळली; एक ठार, तीन गंभीर

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:तिसऱ्या मजल्यावरून लिफ्ट काेसळल्याने एकाचा मृत्यू झाला आहे तर दोन महिलांसह तिघे जखमी झाले आहेत. नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामधील एका इमारतीत ही दुर्घटना घडली. गंभीर जखमी झालेल्यांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शहरातील नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये एका इमारतीमधील लिफ्ट काेसळून झालेल्या अपघातात शुभम झेंडे (वय १९) या युवकाचा मृत्यू झाला आहे. या अपघातात ओंकार निमसे

(वय १९), प्रिया पवार (वय ४०) व शीतल चिमखडे (वय २५) हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यापैकी दोन जणांवर खाजगी तर एका महिलेवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्हा रुग्णालयात दाखल जखमी महिलेची प्रकृती चिंताजनक आहे.

अपघातात मृत्यू आणि जखमी झालेल्या व्यक्ती कामगार -घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक संपत शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. काेतवाली पाेलिसांनी याची नाेंद घेतली आहे. या अपघाताबाबत पोलीस अधिक माहिती घेत आहेत.

सर्वसाधारणपणे लिफ्ट मेंटेनन्स एखाद्या एजन्सीला दिले असते. त्यांच्याकडून लिफ्टच्या सुरक्षा, तांत्रिक दुरुस्ती अपेक्षित असते. याबाबत पोलीस माहिती घेत आहेत. मार्केट यार्ड परिसरात बाजार समितीच्या आवारातील ही घटना अभय

 मशिनरी दुकान असलेल्या इमारतीत घडली आहे. ही इमारत चार मजली आहे. अपघातात मृत्यू आणि जखमी झालेल्या व्यक्ती ह्या कामगार आहेत.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!