Thursday, August 11, 2022

या आमदाराची जीभ घसरली! रस्ते कंगना राणौतच्या गालापेक्षा चांगले करणार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अभिनेत्री कंगणा रणौतविषयी वादग्रस्त वक्तव्य करून काँग्रेस आमदार डॉ. इरफान अन्सारी वादात सापडण्याची शक्यता आहे. जामताडामधील रस्ते कंगना रणौतच्या गालापेक्षाही चिकने बनवले जातील, असे ते म्हणाले.

अन्सारी हे झारंखंडच्या जामताडामधील काँग्रेस आमदार आहेत. ते नेहमी वेगवेगळी वादग्रस्त वक्तव्ये केल्याने चर्चेत राहिले आहेत.सुप्रीमो लालू प्रसाद यांच्या शैलीत ते म्हणाले की, अभिनेत्री कंगना रणौतच्या गालापेक्षा जामताडाचे रस्ते चिकने बनवले जातील.

या रस्त्यांवरून आदिवासी मुले, तरुण आणि व्यापारी वर्गाला फायदा होईल. काही वर्षांपूर्वी लालू प्रसाद यांनी बिहारच्या रस्त्यांबाबत असेच विधान केले होते. बॉलीवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या गालासारखा सुंदर रस्ता तयार करीन, असा दावा त्यांनी केला. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्यावर बराच गदारोळ झाला होता.

वास्तविक, आमदार अन्सारी यांनी त्यांच्या विधानसभा मतदारसंघासाठी सरकारकडून 14 रस्ते मंजूर करवून घेतले आहेत. या रस्त्यांच्या बांधकामासंदर्भात त्यांनी कंगनाविषयी वादग्रस्त विधान केलं आहे. जामताडा येथील पायाभूत सुविधांचे

बळकटीकरण हे आपले प्राधान्य असल्याचे आमदार म्हणाले. परिसरातील आदिवासीबहुल गावातील रस्ते जागतिक दर्जाचे करण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी सांगितले.डॉ. इरफान अन्सारी या आठवड्याच्या सुरुवातीला त्यांच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत होते.

तेव्हा त्यांनी लोकांनी करोनापासून बचावासाठी जास्त काळ फेस मास्क घालू नये, कारण ते आरोग्यासाठी हानिकारक आहे, असं वक्तव्य केलं होतं. स्वतः डॉक्टर असल्याचं म्हणत मास्कचा जास्त आणि दीर्घकाळ वापर केल्याने कार्बन डायऑक्साइड इनहेलेशन होते, असं ते म्हणाले होते.

ताज्या बातम्या

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हर घर तिरंगा अभियान राबविणार-सरपंच प्रा.उषा मिसाळ

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हद्दी मध्ये दि.१३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट दरम्यान भारत देश स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबवणार आहे...

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नेवासा ते औरंगाबाद मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

नेवासा/प्रतिनिधी श्री क्षेत्र नाणीज येथील जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने नेवासा फाटा येथे मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ मंगळवार दि.९ ऑगस्ट रोजी विधिवत...

पत्रकारिता अभ्यासक्रमात भाऊसाहेब कासार प्रथम तर रमेश खरबस द्वितीय

  माय महाराष्ट्र न्यूज:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत शिक्षक भाऊसाहेब कासार हे प्रथम तर रमेश खरबस यांनी द्वितीय...

नागेबाबा मल्टीस्टेटच्या मयत सभासदाच्या वारसाला १० लाखाचा धनादेश प्रदान

राहुरी/प्रतिनिधी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या मयत सभासदाच्या वारसांना नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत आज राहुरी येथे माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे व शिवशाहीर विजय तनपुरे यांचे...

हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता- स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:--  हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात  हनुमंतरायांची मनोभावे सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन श्री क्षेत्र...

यिन केंद्रीय कॅबिनेट सभापतीपदी दिव्या भोसले यांची वर्णी संपूर्ण राज्यातील युवकांमधून झाली निवड

मुंबई/प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या यिन 'कॉनक्लेव २०२२' कार्यक्रमात भरघोस मताधिक्क्याने जळगावच्या दिव्या भोसले यांची यिन केंद्रीय कॅबिनेट सभापती म्हणून निवड करण्यात आली.राज्यातील लाखो युवकांनी दिव्या भोसले...
error: Content is protected !!