Thursday, August 11, 2022

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते

उघडण्यासाठी आणि आर्थिक गुंतवणुकीशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आधारची माहिती सादर करावी लागते.दररोज आर्थिक व्यवहारांच्या निमित्ताने कोट्यवधी आधार क्रमांकांचे

ओटीपीच्या माध्यमातून व्हेरिफिकेशन सुरू असते. अनेक महत्त्वाच्या करारांमध्ये आधारची माहिती हा मुख्य आधार आहे.आधारचे महत्त्व वाढले आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आधार आवश्यक आहे. हल्ली तर जन्मलेल्या बाळांची पण

आधारकार्ड तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नव्या नियमानुसार जन्म होताच संबंधित हॉस्पिटलकडून प्रमाणपत्र वा स्लिप घेऊन पालक बाळाच्या आधारसाठी अर्ज करू शकतात. बाळ पाच वर्षांचे होईपर्यंत त्याच्या बायोमेट्रिकची आवश्यकता नसते.

पण नंतर त्याचे बायोमेट्रिक घेतले जाते. इतरांच्या आधार प्रमाणेच बाल आधार आहे.बाल आधार’साठी मुलाच्यावतीने त्याचे पालक अर्ज करू शकतात नोंदणीसाठी मुलाचे वय पाच पेक्षा कमी असणे आवश्यक

मुलाच्या जन्माचा दाखला (बर्थ सर्टिफिकेट), मुलाच्या पालकांचे आधार क्रमांक आणि किमान एका पालकाचा फोन नंबर तसेच मुलाचा पासपोर्ट साइझ (आकाराचा) फोटो. मूल आणि पालक यांच्यातील

नाते दर्शविणाऱ्या कागदपत्रांना महत्त्व आहे हे लक्षात ठेवा. छाननीअंती अर्ज मंजूर होतो आणि ‘बाल आधार’ दिले जाते.

ताज्या बातम्या

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हर घर तिरंगा अभियान राबविणार-सरपंच प्रा.उषा मिसाळ

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हद्दी मध्ये दि.१३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट दरम्यान भारत देश स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबवणार आहे...

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नेवासा ते औरंगाबाद मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

नेवासा/प्रतिनिधी श्री क्षेत्र नाणीज येथील जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने नेवासा फाटा येथे मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ मंगळवार दि.९ ऑगस्ट रोजी विधिवत...

पत्रकारिता अभ्यासक्रमात भाऊसाहेब कासार प्रथम तर रमेश खरबस द्वितीय

  माय महाराष्ट्र न्यूज:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत शिक्षक भाऊसाहेब कासार हे प्रथम तर रमेश खरबस यांनी द्वितीय...

नागेबाबा मल्टीस्टेटच्या मयत सभासदाच्या वारसाला १० लाखाचा धनादेश प्रदान

राहुरी/प्रतिनिधी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या मयत सभासदाच्या वारसांना नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत आज राहुरी येथे माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे व शिवशाहीर विजय तनपुरे यांचे...

हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता- स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:--  हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात  हनुमंतरायांची मनोभावे सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन श्री क्षेत्र...

यिन केंद्रीय कॅबिनेट सभापतीपदी दिव्या भोसले यांची वर्णी संपूर्ण राज्यातील युवकांमधून झाली निवड

मुंबई/प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या यिन 'कॉनक्लेव २०२२' कार्यक्रमात भरघोस मताधिक्क्याने जळगावच्या दिव्या भोसले यांची यिन केंद्रीय कॅबिनेट सभापती म्हणून निवड करण्यात आली.राज्यातील लाखो युवकांनी दिव्या भोसले...
error: Content is protected !!