भेंडा
नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या शेळीचा फडशा पाडला आहे.
याबाबद अधिक माहिती अशी की, सोमवार दि.17 जानेवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास श्रीकांत भिमराज शिंदे यांनी आपल्या घराचे अंगणात चार ते पाच शेळ्या बांधल्या होत्या.
अचानक घराशेजारील ऊसातून आलेल्या बिबट्याने अंगणात बांधलेली शेळीवर झडप घालून शेळी ऊसाकडे ओढत नेली.मात्र आजूबाजूच्या लोकांनी आरडाओरड केल्याचे शेळीला टाकून बिबट्या ऊसात पसार झाला.शेळीच्या नरडयाला बिबट्याचे चार दात लागल्याने शेळीचा मृत्यू झाला.
वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.