Tuesday, May 17, 2022

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले (वय 43) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे.

या संदर्भात मृतकाच्या पत्नीने आशा अण्णासाहेब नवले यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.अण्णासाहेब नवले यांनी आरोपी सुदाम दुधे व बालकिसन यांच्याकडून २० हजार रुपये व्याजाने घेतले होते. नवले यांनी व्याजाने घेतलेल्या २० हजार रुपयांच्या

बदल्यात सावकारांना तब्ब्ल दीड लाख रुपये दिले होते. आरोपींना दीड लाख रुपये देऊनही ते आणखीन व्याज मागत होते. सावकारांनी नवले यांना पैशाचीमागणी करून वेळोवेळी त्रास दिला असून, या त्रासाला कंटाळून

नवले यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे फिर्यादीत सांगितले आहे.याबाबत मृतक अण्णासाहेब नवले यांच्या पत्नी आशा नवले यांनी आरोपी सुदाम दुधे व बालकिसन यांच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात आत्महत्येस

प्रवृत्त केल्या बाबत फिर्याद दाखल केली असून, सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख हे करीत आहे.

ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील मोठी बातमी! महाराष्ट्रातील निवडणुकांबाबत सुप्रिम कोर्टाचा मोठा आदेश

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी घ्यायच्या याबाबत सुप्रिम कोर्टात सुनावणी सुरु आहे. जिथे पावसाळा आहे तिथे मान्सून नंतर निवडणूका घ्या असा...

ऑनलाइन क्लास सुरू असताना प्राध्यापिकेच्या मोबाइलवर आला अश्लील व्हिडिओ

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन क्लास सुरू असतानाच विद्यार्थिनींसह प्राध्यापिकेच्या स्मार्टफोनवर अश्लील मेसेज आणि व्हिडिओ आल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड शहरात उघडकीस आला. विष्णुपुरी ग्रामीण तंत्रनिकेतन महाविद्यालयात हा...

या गोष्टींमुळे महिला पुरुषांकडे आकर्षित होतात

माय महाराष्ट्र न्यूज:काही वेळा पुरूष सहज काहीतरी वागून किंवा बोलून जातात. मात्र त्यांच्या छोट्या-छोट्या गोष्टी महिलांवर छाप सोडतात. जाणीवपूर्वक प्रयत्न करणाऱ्या नाही तर महिलांच्या...

या पठ्ठ्याने म्हणून दोनशे क्विंटल कांदा मोफत वाटला

माय महाराष्ट्र न्यूज:वर्षभर कष्ट करुन कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना शेतकऱ्याला करावा लागतो. अनेक अडचणींवर मात करत उभं केलेलं पिक अनेकदा आस्मानी...

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात खळबळजनक बातमी : काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?

माय महाराष्ट्र न्यूज:गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसपूस वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकविध मुद्द्यांमुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागला आहे. स्थानिक...

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना मेघगर्जनेसह पावसाचा इशारा…

माय महाराष्ट्र न्यूज:उत्तर भारतात तापमानाचा पारा वाढत असताना आता दक्षिण भारतात नैऋत्य मोसमी वाऱ्यांचं आगमग होत आहे.अंदमाननंतर आता नैऋत्य मोसमी वारे बंगालच्या उपसागरापर्यंत पोहोचले...
error: Content is protected !!