Tuesday, May 17, 2022

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या १,४३२ करोना रुग्णांची भर पडली आहे.

त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या ५,९२६ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.४३ टक्क्यांवर घसरलं आहे. सर्वाधिक ५२२ रुग्ण नगर शहरात आहेत. नगर ग्रामीण, राहाता, पारनेर व श्रीरामपूर या तालुक्यांतही रुग्णसंख्येने शंभरी ओलांडली आहे.

दुसरी लाट दीर्घकाळ रेंगाळलेल्या नगर जिल्ह्यात यावेळीही रुग्णसंख्या वाढतच आहे. सोमवारी एका दिवसात दीडपट रुग्णवाढ झाली आणि मंगळवारीही ही वाढ कायम राहिली आहे.

आणखी काही काळ रुग्ण वाढणार असल्याचा अंदाज आल्याने आता सर्व तालुक्यांतील कोविड केअर सेंटर पुन्हा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत या सूचना दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी भोसले म्हणाले की, जिल्ह्यातील करोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने अधिक सतर्क राहून काम केलं पाहिजे. त्यासाठी दररोजच्या चाचण्यांची संख्या नेहमीपेक्षा अधिक वाढवली पाहिजे‌. दुसरा डोस घेण्यासाठी

पात्र असलेल्या मात्र लसीकरण न केलेल्या लोकांची संख्या काही तालुक्यांमध्ये जास्त आहे. दुसरा डोस घेण्यासाठी नागरिकांना प्रवृत्त करावे, अशा सूचनाही डॉ. भोसले यांनी केल्या.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे म्हणाले की, शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील रूग्ण पॉझिटिव्हिटी दर जास्त आहे‌. यासाठी कोविड नियमांचं काटेकोर पालन करण्यावर भर देण्याची अवश्यकता आहे.

ताज्या बातम्या

मनी प्लांटशी संबंधित या 5 चुका नका करू…नाहीतर होईल नुकसान, जाणून घ्या

माय महाराष्ट्र न्यूज:वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट लावल्याने आर्थिक समृद्धी येते. घरामध्ये माळरान ठेवल्याने सुख-समृद्धी येते. याशिवाय मनी प्लांट हे रोप ऑफिस किंवा दुकानातही ठेवता येते....

महाराष्ट्रातील मोठी बातमी! महाराष्ट्रातील निवडणुकांबाबत सुप्रिम कोर्टाचा मोठा आदेश

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी घ्यायच्या याबाबत सुप्रिम कोर्टात सुनावणी सुरु आहे. जिथे पावसाळा आहे तिथे मान्सून नंतर निवडणूका घ्या असा...

ऑनलाइन क्लास सुरू असताना प्राध्यापिकेच्या मोबाइलवर आला अश्लील व्हिडिओ

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन क्लास सुरू असतानाच विद्यार्थिनींसह प्राध्यापिकेच्या स्मार्टफोनवर अश्लील मेसेज आणि व्हिडिओ आल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड शहरात उघडकीस आला. विष्णुपुरी ग्रामीण तंत्रनिकेतन महाविद्यालयात हा...

या गोष्टींमुळे महिला पुरुषांकडे आकर्षित होतात

माय महाराष्ट्र न्यूज:काही वेळा पुरूष सहज काहीतरी वागून किंवा बोलून जातात. मात्र त्यांच्या छोट्या-छोट्या गोष्टी महिलांवर छाप सोडतात. जाणीवपूर्वक प्रयत्न करणाऱ्या नाही तर महिलांच्या...

या पठ्ठ्याने म्हणून दोनशे क्विंटल कांदा मोफत वाटला

माय महाराष्ट्र न्यूज:वर्षभर कष्ट करुन कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना शेतकऱ्याला करावा लागतो. अनेक अडचणींवर मात करत उभं केलेलं पिक अनेकदा आस्मानी...

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात खळबळजनक बातमी : काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?

माय महाराष्ट्र न्यूज:गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसपूस वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकविध मुद्द्यांमुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागला आहे. स्थानिक...
error: Content is protected !!