माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या नेत्यांना राहिलेले नाही. त्यांच्या वक्तव्याची
दखल घेवून तातडीने कारवाई करावी अशी मागणी आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.राज्यातही आघाडीमध्ये पक्षाला निर्णय प्रक्रियेत कुठेही स्थान दिले जात नाही. त्यामुळेच नैराश्येच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही
भान त्यांना राहिलेले नाही, अशा शब्दात आ. विखे यांनी मोदीबद्दल केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला.मोदीबद्दल केले गेलेले वक्तव्य अतिशय गंभीर असल्याने याची गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी अशी मागणी आ.विखे पाटील यांनी केली आहे.