Tuesday, May 17, 2022

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

श्रीरामपूर

श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये देण्यात आले आहे.Dy.s.p.संदीप मिटके यांनी अहमदनगर शहर येथे कार्यरत असताना तोफखाना पोलीस ठाणे अंतर्गत गु.र.न.४५६/२०१८ भा द वि कलम ३७६( अ),( ब),३५४,३२३,५०६,३४ पोक्सो अधिनियम.कलम ५( एम), ६, व १७ या गुन्ह्याचा सर्वोत्कृष्ट तपास केला होता या गुन्ह्याची महाराष्ट्र राज्यात जानेवारी २०२१ महिन्यासाठी च्या सर्वोत्कृष्ट अपराध सिद्धी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे या कामगिरी करता त्यांना गौरविण्यात आले आहे.अहमदनगर पोलीस दलासाठी ही अभिमानास्पद बाब आहे.

दि. १५ सप्टेंबर २०१८ च्या ३ ते ४ दिवस अगोदर सायंकाळच्या वेळेस पिडीत मुलगी भराड गल्ली तोफखाना अहमदनगर येथे बाकड्या जवळ सायकल खेळत असताना आरोपी क्र.१ अफसर लतीफ सय्यद हा पीडित मुलीला बंद घराच्या छतवर् घेऊन गेला तिला विवस्त्र करून हाताने मारहाण केली व् तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग केला त्यावेळी आरोपी क्र २ मुन्नी ऊर्फ शमिना लतिफ सय्यद घटनास्थळी आली आणि तिने पीडित मुलीला झालेल्या प्रकाराबाबत तू तुझे घरी कोणाला काही एक सांगू नकोस नाहीतर मी तुझे घरी येऊन तुझे आईला तुझे नाव सांगेल अशी धमकी दिली व तिला तिच्या घरी पाठवून दिले त्यानंतर दुसऱ्या दिवशी आरोपी अफसर लतीफ सय्यद याने पीडित मुलीस पुन्हा सायंकाळी चे वेळेस त्यात ठिकाणावरील बाकड्या जवळून उचलून त्यांच्या घराच्या छतावर नेले आरोपीने पीडित मुलीस जीवे मारण्याची भीती दाखवून तिला विवस्त्र करून तिच्यावर शारीरिक अत्याचार केला तसेच कोणाला काही सांगू नको नाहीतर मी तुझा जीव घेईल असे म्हणून घरी पाठवून दिले त्यानंतर पीडित मुलीच्या पोटात दुखत असलेने फिर्यादी हि तिला दवाखान्यात चल असे म्हणाली असता पीडित मुलगी घाबरलेली होती फिर्यादी हिस काही सांगत नव्हती हे पाहून फिर्यादीने तिच्या बहिणीला फोन करून बोलावून घेतले व पीडित मुलीला विश्वासात घेऊन विचारले असता पीडित मुलीने तीन दिवसापूर्वी तिच्यावर झालेल्या अत्याचाराबाबत सांगितले फिर्यादीने सदर घटनेबाबत तिच्या पतीला सांगितल्यानंतर ते पीडित मुलीस तोफखाना पोलीस स्टेशन येथे फिर्याद देण्यासाठी घेऊन गेले सदर घटनेबाबत आरोपीविरुद्ध भा द वि क ३७६( ए)( बी) ३५४,३२३,५०६सह् ३४ तसेच बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा( पॉक्सो)२०१२ चे कलम५( एम),६ व१७ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला सदर गुन्ह्याचे विरोधात राज्यभर पडसाद उमटले होते विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी मोर्चे व आंदोलने करून निषेध व्यक्त केला होता प्रथम या गुन्ह्याचा तपास Psi.विशाल सणस यांच्याकडे होता या. गुन्ह्याचे गांभीर्य व संवेदनशीलता ओळखून पुढील तपास Dy.s.pसंदीप मिटके यांचेकडे वर्ग करण्यात आला होता. त्यांनी या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. सदर प्रकरणात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी आरोपी क्र. १ अफसर लतिफ सय्यद यास भादवि का कलम ३७६( ए) ( बी),३५४ बी,३२३ बालकांचे लैंगिक अत्याचाराचे संरक्षण कायदा ( पॉक्सो)२०१२ चे कलम (एम),६,८ व१० प्रमाणे दोषी धरले आणि २० वर्षे सश्रम कारावास व ५००००रु दंड आणि दंड न भरल्यास १वर्ष सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली सदर दंडाची रक्कम पीडित मुलीस नुकसान भरपाईपोटी देण्याचे आदेश पारित केले तसेच आरोपी क्र. २) मुन्नी उर्फ शमीना सय्यद वय५२ वर्ष रा.भराड गल्ली मीरावली बाबा दर्गाजवळ तोफखाना जि.अहमदनगर बालकांचे लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा (पोस्को २०१२ चे १७ व २१ प्रमाणे दोषी धरुन एक महिना साधी कैद (प्रत्येकी) ५००/-दंड व दंड न भरल्यास १० दिवस साधी कैद अशी शिक्षा ठोठावली.
*सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांचे मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी Dysp संदीप मिटके आणि त्यांचे पथकातील परिविक्षाधीन Dysp पुनम पाटील,PSIविशाल सणस, PSI जया तारडे, ASI भालसिंग, HC सुयोग सुपेकर, PC याकूब सय्यद आदींनी केला.*

 

ताज्या बातम्या

मनी प्लांटशी संबंधित या 5 चुका नका करू…नाहीतर होईल नुकसान, जाणून घ्या

माय महाराष्ट्र न्यूज:वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट लावल्याने आर्थिक समृद्धी येते. घरामध्ये माळरान ठेवल्याने सुख-समृद्धी येते. याशिवाय मनी प्लांट हे रोप ऑफिस किंवा दुकानातही ठेवता येते....

महाराष्ट्रातील मोठी बातमी! महाराष्ट्रातील निवडणुकांबाबत सुप्रिम कोर्टाचा मोठा आदेश

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी घ्यायच्या याबाबत सुप्रिम कोर्टात सुनावणी सुरु आहे. जिथे पावसाळा आहे तिथे मान्सून नंतर निवडणूका घ्या असा...

ऑनलाइन क्लास सुरू असताना प्राध्यापिकेच्या मोबाइलवर आला अश्लील व्हिडिओ

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन क्लास सुरू असतानाच विद्यार्थिनींसह प्राध्यापिकेच्या स्मार्टफोनवर अश्लील मेसेज आणि व्हिडिओ आल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड शहरात उघडकीस आला. विष्णुपुरी ग्रामीण तंत्रनिकेतन महाविद्यालयात हा...

या गोष्टींमुळे महिला पुरुषांकडे आकर्षित होतात

माय महाराष्ट्र न्यूज:काही वेळा पुरूष सहज काहीतरी वागून किंवा बोलून जातात. मात्र त्यांच्या छोट्या-छोट्या गोष्टी महिलांवर छाप सोडतात. जाणीवपूर्वक प्रयत्न करणाऱ्या नाही तर महिलांच्या...

या पठ्ठ्याने म्हणून दोनशे क्विंटल कांदा मोफत वाटला

माय महाराष्ट्र न्यूज:वर्षभर कष्ट करुन कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना शेतकऱ्याला करावा लागतो. अनेक अडचणींवर मात करत उभं केलेलं पिक अनेकदा आस्मानी...

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात खळबळजनक बातमी : काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?

माय महाराष्ट्र न्यूज:गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसपूस वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकविध मुद्द्यांमुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागला आहे. स्थानिक...
error: Content is protected !!