Thursday, December 7, 2023

सौ.बेबीताई गायकवाड यांचा महाराष्ट्र दिनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने होणार सन्मान

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

अहमदनगर

नगर येथील वाचन संस्कृती व महिला सबलीकरण चळवळीतील कार्यकर्त्या सौ.बेबीताई अशोक गायकवाड सन २०१७-१८ या वर्षासाठीचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी निवड झालेली असून सदर पुरस्कार १ मे रोजी पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

नगरचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी बी.बी. वारुडकर यांनी पत्राद्वारे सौ.गायकवाड यांना कळविले आहे की,महाराष्ट्र शासन निर्णयानुसार सन २०१७-१८ या वर्षासाठीचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी आपली निवड झालेली आहे.

आपणास सदर पुरस्कार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार वितरण मा. ना. पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांचे हस्ते वितरण करण्यास मान्यता मिळालेली आहे. तरी आपण दि. ०१ मे २०२३ रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ वा वर्धापन दिन समारंभ कार्यक्रमाचे ठिकाणी सकाळी ०७ वा जिल्हा पोलीस ग्राऊंड अहमदनगर येथे स्वत: उपस्थित राहावे व पुरस्कार स्विकारावा.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!