नेवासा
नेवासा बतालुक्यातील वडाळा बहीरोबा येथे आयपीएल क्रिकेट सामन्याचे हार-जितीवर खेळाडुचे रन्स व विकेट यावर मोबाईल फोनवर क्रिकेट बिटींग करताना वडाळा येथील एकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.
या बाबद नगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोना सचिन दत्तात्रय आडबल यांनी सरकार तर्फे फिर्याद दिली की,दि. २६ एप्रिल २०२३ रोजी मी, पोहेकॉ संदिप कचरु पवार, पोहेकॉ मनोहर सिताराम गोसावी, पोकॉ रणजीत पोपट जाधव, पोकॉ शिवाजी अशोक ढाकणे सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर हे नेवासा पोलिस स्टेशन हददीत अवैध धंदयावर कारवई करणे कामी गस्त घालत असतांना पोहेका गोसावी यांना यांना गुप्त बातमीदारा मार्फत खात्रीशिर बातमी मिळाली की, इसम नामे साजीत उस्मान पठाण, रा.वडाळा बहिरोबा, ता. नेवासा हा माळीचिंचोरा फाटा, ता.नेवासा येथे उघडयावर सध्या चालु असलेल्या कोलकाता नाईट राईडर्स विरुध्द रॉयल चँलेजर्स बँगलोर या दोन संघा मध्ये चालु असलेल्या आयपीएल क्रिकेट सामन्याचे हार-जितीवर खेळाडूचे रन्स व विकेट बेटींग जुगार हा चालवितो.
सध्या सदर ठिकाणी क्रिकेट बिटींग जुगार चालु आहे अशी बातमी मिळाल्याने पोहेकॉ मनोहर गोसावी यांनी लागलीच दोन पंचांना वडाळा बहिरोबा येथे बोलावून घेवून त्यांना बातमीतील हकिगत समजावुन सांगुन त्यांची सहमती नंतर आमचे सोबत लॅपटॉप व प्रिन्टर बरोबर घेवून छाप्याचे नियोजन केले.
त्यांनतर आम्ही पोलीस स्टाप व पंच असे खासगी वाहनाने बातमीतील नमुद ठिकाणी जावून खात्री केली असता सदर ठिकाणी माळीचिंचोरा फाटा येथे एक इसम उघडयावर एका मोबाईलचे स्क्रिनवर कोलकाता नाईट राइडर्स विरुध्द रॉयल चॅलेजर्स बेंगलोर या दोन संघा मध्ये आयपीएल क्रिकेट सामना चालु होता व त्याच मोबाईवरुन सदर एक इसम त्याचे कडील रजिस्टरचे पानांवर इंग्रजी भाषेत आकडेवारी लिहीत होता. त्यांचेकडील भ्रमणध्वनिवरुन संभाषण करीत होता. क्रिकेट बिटींग जुगार चालवित असल्याचे खात्री झाल्याने आम्ही सदर इसमास आम्ही पोलीस व पंचाची ओळखी करुन देवून त्यांना जागीच २३:२० वाजेच्या सुमारास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नावे पत्ते पंचासमक्ष विचारले असता त्याने त्याचे नाव साजीत उस्मान पठाण (वय ३२ वर्षे) रा.वडाळा बहिरोबा ता नेवासा असे असल्याचे सांगितले.
त्यास सदरचा खेळ कोणासाठी घेतो विचारले असता त्याचे काही एक समाधानकारक उत्तरे दिले नाही त्याचे सदरचा खेळ हा स्वताचे अर्थिक फायदया करीता खेळतो व खेळवितो असे सांगितले. वरील इसमाची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता १० हजार रुपये किमतीचा एक सॅमसंग कंपनीचा गोल्डन रंगाचा मोबाईल, आकडेमोड केलेली वही, ३ हजार रुपये रोख रक्कम असा एकुण १३ हजार रूपयांचा मुद्देमाल व क्रिकेट बिटींगची साधने सदर इसमांचे अंगझडतीत मिळून आल्याने ती पंचांसमक्ष पोहेकॉ गोसावी यांनी जागीच दोन पंचा समक्ष पंचनामा करुन ताब्यात घेतले आहे
सदर फिर्यादिवरुन साजीत उस्मान पठाण (वय ३२ वर्षे) रा. वडाळा बहिरोबा, ता. नेवासा याचे विरुद्ध नेवासा पोलिस ठाण्यात मुंबई जुगार प्रतिबंधक अधिनियम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.