Thursday, June 30, 2022

नेवासा-शेवगाव रस्त्याच्या कामाची गुणवत्ता चाचणी करावी -कॉ.बाबा आरगडे

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

तालुक्यात नेवासा फाटा ते कुकाणा सुरू असलेल्या रस्त्याचे कामाची गुणवत्ता चाचणी करण्यात यावी अशी मागणी करून रस्त्याचे दर्जेदार काम न केल्यास कोणत्याही भेंडा येथे रस्तारोको आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते कॉ.बाबा आरगडे यांनी केली आहे.

अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर नेवासा-शेवगाव रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. रस्त्याचे कामासाठी वापरण्यात येणारी खडी,डांबरीकरण,मजबुतीकरणाचे काम निकृष्ट होत असून कामामध्ये डांबरचे प्रमाण अत्यन्त कमी असल्याने मजबुतीकरणाचे काम पुढे चालू मागे उखडले असे सुरू असल्याचा आरोप कॉ.आरगडे व नागरिकांनी केला आहे.

नेवासा-शेवगाव रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले होते. ऑगस्ट महिन्यात खड्डे बुजवून पाच महिन्यांनी रस्ता डांबरीकरणास सुरुवात झाली. रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे खड्डे चुकविताना झालेल्या अपघातात काही लोकांनी जीव गमावला. तर काहींना कायमचे अपंगत्व आले.नेवासा- शेवगाव रस्त्यावरून प्रवास करताना दुचाकी व चारचाकी वाहन चालकांना कसरत करावी लागते. रस्ता दुरुस्तीसाठी वृत्तपत्रे, राजकीय पक्ष
सामाजिक कार्यकर्ते यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्याने रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली.रस्त्याचे काम दर्जेदार व्हावे, अशी अपेक्षा नागरिकांची आहे.

रस्ता कामाला सुरुवात झाली मात्र भानस हिवरे,सौंदाळा-भेंडा येथे डांबरी रस्त्यावर डांबर टाकून त्यावर खडीचा पहिला थर देण्यात आला. त्यावर रोलर फिरविला. मात्र काम केले त्याच दिवशीच रस्त्यावरील खडी निघायला सुरुवात झाली. मजबुती
करण कामात डांबर वापरण्याचे प्रमाण अत्यन्त कमी असल्याने रस्ता उखडत आहे.या रस्त्याचे कामाची गुणवत्ता चाचणी करावी अशी मागणी कॉ.बाबा आरगडे यांनी केली आहे.असेन झाल्यास पूर्वसूचना न देता कोणत्याही क्षणी भेंडा येथे रास्तारोको आंदोलन करण्यात येईल असा इशाराही कॉ.आरगडे यांनी दिला आहे.

आम्ही सुद्धा आंदोलन करू.…

नेवासा-शेवगाव रस्त्याचे कामाचा दर्जा चांगलाच असला पाहिजे ही सर्वांचीच इच्छा आहे.परंतु सध्या सुरू असलेल्या कामाचा दर्जा अत्यन्त खराब असून निकृष्ठ दर्जाचे काम चालू आहे.दर्जेदार काम न केल्यास सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदाराचे विरोधात आम्ही सुद्धा आंदोलन करू.
-*गणेश गव्हाणे*
प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!