Friday, July 1, 2022

सुप्रिया सुळे म्हणतात राजकीय नेत्यांसाठी ही सर्वात मोठी अडचण

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन व देहू नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या नागरी सत्कारानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने खासदार सुप्रिया सुळे मावळमधील देहू इथं व्यासपीठावरुन बोलत होत्या.

त्या म्हणाल्या,’एखादा नेता आपल्या मतदारसंघात, कार्यकर्त्यांसोबत काहीतरी बोलत असतो. त्याचा व्हिडीओ दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी बाहेर येतो आणि तो मोठ्या अडचणीत सापडतो. उदाहरण द्यायचेच झाले तर म्हणजे काँग्रेस

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडाऱ्यातील एका गावात नानातथाकथित गावगुंड मोदीबाबत काहीतरी बोलले आणि अख्खी भाजप त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरली! सांगायचा मुद्दा हा की मोबाईल हा जेवढा सोयीचा तेवढाच तो अडचणीचा ठरतोय.

त्या पुढे म्हणाल्या,’ मोबाईलमुळे नेतेमंडळींसमोर कशाप्रकारे अडचण निर्माण झाली आहे ते बोलून दाखवलं. सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये मात्र चांगलाच हशा पिकला होता.

दरम्यान, खासदार सुळे म्हणाल्या की, आमदार सुनील शेळके हे नेहमीच विकास कामांसाठी आग्रही असतात. त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मदत घेऊन देहूकारांच्या सर्व समस्या सोडवाव्यात. तसेच विकासकामे करत

असताना देहू शहराची असलेली ऐतिहासिक ओळख कायम ठेवावी. देहूमध्ये श्री संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी देशभरातून नागरिक येत असतात. यामुळे आयुष्यात एकदा तरी देहूला जावे, असे परराज्यातील नागरिकांना वाटले पाहिजे, अशी

क्षेत्र देहू शहराची ओळख बनवू. महाराष्ट्रातील संतांचा इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहचला पाहिजे यासाठी कार्य करा. प्रत्येक कुटुंबाने एक झाड लावून त्याचा आपल्या मुलाप्रमाणे सांभाळ करा, असे आवाहन देखील यावेळी खासदार सुळे यांनी नागरिकांना केले.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!