Thursday, June 30, 2022

CNG किट बसवण्यासाठी नवे नियम, ‘या’ गाड्यांना मिळणार परवानगी

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयने सीएनजी किटबाबत नवीन अधिसूचना जारी केली आहे. याचा परिणाम अनेक कार चालकांवर होणार असून आता तुम्ही लवकरच BS-6 पेट्रोल वाहने CNG किटसह रस्त्यावर चालवू शकाणार आहात.

सरकारच्या अधिसूचनेनुसार भारत स्टेज (BS-6) वाहनांमध्ये CNG आणि LPG किटचे रेट्रो फिटमेंट तसेच 3.5 टनापेक्षा कमी वजनाचे डिझेल-पेट्रोल इंजिन हे CNG/LPG किटमध्ये बदलण्यास परवानगी देण्यात येणार आहे.

आता BS-VI उत्सर्जन नियमांनुसार मोटार वाहनांमध्ये CNG आणि LPG किटचे रेट्रो फिटमेंट करण्याची परवानगी होती. पण नव्या प्रस्तावित हालचालीमुळे सर्व नवीन वाहनांना भारत VI उत्सर्जन मानदंडांच्या CNG वाहनांमध्ये रूपांतरित करता येईल.

याबाबत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सीएनजी हे पर्यावरणपूरक इंधन आहे आणि त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल इंजिनच्या तुलनेत कार्बन मोनॉक्साईड, हायड्रोकार्बन्स आणि धुराच्या उत्सर्जनाची पातळी कमी होईल.

अनेकांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रालयाने 30 दिवसांच्या आत सूचनाही मागवल्या आहेत जेणेकरुन आवश्यक असल्यास ते आपल्या अंतिम अधिसूचनेत आवश्यक बदल करू शकेल. मंत्रालयाने म्हटले आहे की,

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 27 जानेवारीच्या अधिसूचनेमध्ये भारत स्टेज (बीएस) गाड्यांमध्ये सीएनजी आणि एलपीजी किटच्या रेट्रो फिटिंगद्वारे बदल करण्यास आणि सीएनजी/एलपीजी इंजिनसह डिझेल इंजिन बदलण्याची परवानगी दिली आहे.

आत्तापर्यंत, सीएनजी आणि एलपीजी किटचे रेट्रो फिटमेंट फक्त बीएस-IV उत्सर्जन मानदंड असलेल्या वाहनांमध्येच परवानगी आहे.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!