जामखेड:व्याजाने घेतलेली वीस हजार रुपये मुद्दल एकरकमी देवुनही व्याजासह ७ लाख रूपये फिरत आहेत, असे म्हणुन पैसे परत कर असा तगादा लावला. डिसेंबर २०२० ते आजपर्यंतहोत असलेल्या पैश्यांची मागणीला वैतागून चित्रा विश्वनाथ समुद्र
यांनी पोलीसात तक्रार दिली आहे. घरामध्ये काम करित असताना खाजगी सावकार मंगल मोरे हीने घरामध्ये येवुन पैसे दिले नाही म्हणुन शिवीगाळ दमदाट केली. मी तुमचे पैसे परत केले आहेत मग मला शीवीगाळ का करता असे म्हणाल्याचा राग
आल्याने मंगल मोरे हीने मला लाथाबुक्याने मारहान केली व आठ दिवसामध्ये माझे पैसे परत नाही केले तर जिवे ठार मारुन टाकीन अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.चित्रा विश्वनाथ समुद्र यानी फिर्यादीत म्हटले आहे की, माझे घरामध्ये
मी सोडुन दुसरे कोणीही कमवते नसल्यामुळे मला माझे घरगुती आडचनी कामी पैश्याची अवश्यकता होती. त्यामुळे मी खाजगी सावकार असलेल्या मंगल मोरे या महिलेकडून विस हजार रूपये घेतले होते. त्यानुसार मी २३ फेब्रुवारी २०२० रोजी
घेतलेली २०,००० रुपये मुद्दल एकरकमी देवुन टाकली. अशा पध्तीने मी मंगल मोरे यांचे कडुन घेतलेले २०००० रुपये व्याजासहीत २७ नोव्हेंबर २०२० रोजी परत केले मात्र खाजगी सावकार असलेल्या मंगल मोरे या महिलेने मला वरील
रक्कमेपोटी सदर पैशाचे तुझ्याकडे व्याजासह ७ लाख रूपये फिरत (येणे) आहेत. असे म्हणुन सदर पैसे परत कर असे म्हणत वेळीअवेळी तगादा लावला. तसेच डिसेंबर २०२० ते आजपर्यंत मला पैश्यांची मागणी करत आली. दि. २७/१/२०२२ रोजी सकाळी ९:०० वाजेचे
सुमारास. मी माझे घरामध्ये काम करीत असताना खाजगी सावकार मंगल मोरे ही माझे घरामध्ये येवुन मला पैसे दिले नाही म्हणुन शिवीगाळ दमदाट करु लागली. त्यावेळी मी तीला म्हणले की, मी तुमचे पैसे परत केले आहेत. मला शीवीगाळ
का करता असे विचारल्याचा तिला राग आल्याने मंगल मोरे हीने मला लाथाबुक्याने मारहान केली व आठ दिवसामध्ये माझे पैसे परत नाही केले तर जिवे ठार मारुन टाकीन अशी धमकी देवुन घरामधुन निघून गेली. अशाप्रकारे दि. २७ रोजी सकाळी ९ वाजताचे
सुमारास मी माझे घरामध्ये काम करित असताना मी मंगल मोरे यांचे कडुन घेतलेल्या २० हजार रुपयांचे बदल्यात व्याजासहीत ७ लाख रूपये का दिले नाही म्हणुन घरामध्ये घुसुन लाथाबुक्याने मारहान करून शिवीगाळ दमदाटी करुन जिवे
ठार मारन्याची धमकी दिली व सावकारकीचा कोणताही अधिकृत परवाना नसताना बेकायदेशीररित्या व्याजाने पैसे दिले म्हणून फिर्यादी चित्रा विश्वनाथ समुद्रे वय ३५ धंदा – मजुरी रा. नागेश शाळेजवळ जामखेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून
मंगल मोरे या खाजगी सावकारांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड हे करत आहेत.