भेंडा/नेवासा
उमेदवारांची इच्छा नसतांना ही विरोधकांनी बळजबरी करून उमेदवार उभे केले असल्याची टिका माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी केली.
बुधवार दि.२६ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता आ. शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलचा प्रचार मेळावा माजी आ.चंद्रशेखर घुले पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत व माजी आ. पांडुरंग अभंग यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
ज्ञानेश्वरचे संचालक अड. देसाई देशमुख,मुळाचे अध्यक्ष नानासाहेब तुवर,उपाध्यक्ष कडुबाल कर्डिले,संचालक भाऊसाहेब मोटे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काशीनाथ नवले, माजी सभापती रावसाहेब कांगुणे,तुकाराम मिसाळ, अशोकराव मिसाळ व्यासपीठावर उपस्थित होते.
श्री.अभंग पुढे म्हणाले,नेवासा तालुक्यातील एकोपा कायम ठेवण्याची ही एक संधी आहे.गडाख-घुले यांचे नेतृत्वाखाली समाजासाठी आपल्याला काम करायचे आहे. तालुक्यातील सर्व संघटना आपल्या विचारा बरोबर आहेत. बाजार समितीची ही निवडणूक तालुक्यातील राजकारणाला दिशादर्शक ठरणार असल्याने कार्यकर्त्यांनी शंभर टक्के मतदान घडवून आणावे, एक हि मत बाद होणार नाही याची दक्षता घ्यावी. आपल्याला आपली ताकद दाखवून द्यायची आहे, विकासाची गंगा लोकांपर्यंत न्यायची आहे.कोणत्या मतदारसंघात किती मते द्यायची हे समजून सांगत रविवार दि.३० एप्रिल २०२३ रोजी होणाऱ्या मतदानाचे वेळी सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.
श्री.चंद्रशेखर घुले म्हणाले की,
शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळाला तरच विश्वास निर्माण होतो. लोकनेते मारुतराव घुले पाटील व यशवंतराव गडाख साहेब यांनी बँकेच्या माध्यमातून पाईपलाईनसाठी कर्ज उपलब्ध करून दिल्याने शेतीला पाणी
मिळाले आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले. उसाबरोबरच कांद्याचे क्षेत्रही वाढले. नेवासा बाजार समितीच्या माध्यमातून घोडेगाव येथे कांदा व देशातील सर्वात मोठा म्हशींचा बाजार असून त्या माध्यमातून ग्रामीण अर्थकारण सक्षम झालेले आहे. विरोधक संभ्रम निर्माण करतील, त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. ही निवडणूक विधानसभेची नांदी आहे असे समजून कामाला जागा असे आवाहन श्री.घुले यांनी केले.
अड.देसाई देशमुख, नानासाहेब तुवर,श्रीरंग हारदे, अजित मुरकुटे,बाळासाहेब नवले,सागर महापुर यांनी ही मनोगत व्यक्त केले.
यावेळी बबनराव पिसोटे, रामभाऊ जगताप,कारभारी जावळे, मोहनराव गायकवाड़,वैभव नवले, शरद आरगडे, सोपान महापूर,नामदेव निकम,राजेंद्र चामुटे,जनार्दन पटारे,प्रभाकर कोलते, मछिंद्र म्हस्के, हरिभाऊ शेळके, शशिकांत मतकर, रामदास गोल्हार, पोपटराव जिरे यांचेसह सर्व उमेदवार, कार्यकर्ते, मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काशीनाथ नवले यांनी प्रास्ताविक केले.
बाजार समितीचे माजी अध्यक्ष डॉ शिवाजी शिंदे यांनी उमेदवारांचा परिचय करून दिला.
भाऊसाहेब सावंत यांनी सूत्रसंचालन केले.गणेश गव्हाणे यांनी आभार मानले.