Saturday, July 2, 2022

महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने घट; जाणून घ्या आकडेवारी

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने घट होताना दिसत आहे. चार दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. शनिवारी राज्यात 27,971 नव्या रुग्णांची नोंद झाली होती.

रविवारी यामध्ये आणखी घट झाली आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी राज्यात 22 हजार 444 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 39,015 जणांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण

95.14 टक्के इतका झाला आहे. रविवारी राज्यात 50 रुग्णाची कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर 1.85 टक्के एवढा झाला आहे. राज्यात 2,27,711 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची

एकूण संख्या 77,05,969 झाली आहे. सध्या राज्यात 12,61,198 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 3,332 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. रविवारी राज्यात पाच नव्या ओमायक्रॉन रुग्णांची भर पडली आहे. आज आढललेल्या

सर्व रुग्णांचे रिपोर्ट राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडून आले आहेत. हे पाचही रुग्ण पुणे महानगर पालिका क्षेत्रातील आहेत. पाच रुग्णामुळे राज्यातील एकण ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या 3130 इतकी झाली आहे. दिलासादायक बाब

म्हणजे, राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णांपैकी 1674 जणांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे. आजपर्यंत एकूण 6605 नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांपैकी 6510 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि 95 नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!