माय महाराष्ट्र न्यूज:देशासह राज्यात करोनाची तिसरी लाट सुरू असून मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. राज्यात शनिवारी 27 हजार रुग्ण आढळले आहेत. मात्र तज्ज्ञांच्या माहितीनुसार
मार्च महिन्याच्या मध्यात करोनाची ही लाट संपुष्टात येईल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.करोनाची तिसरी लाट ही मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत संपुष्टात येईल, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. करोनाचा निओकॉन
हा व्हेरियंट धोकायदायक आणि घातक असल्याचं म्हटलं जातंय. परंतु राज्यातील आरोग्य यंत्रणा या विषाणुचा सामना करण्यासाठी सक्षम आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटना त्यावर संशोधन करत आहे.
विशेष म्हणजे त्यात मृत्यूदर 30 टक्के आहे असे सांगितलं गेले आहे.तो ओमायक्रॉनइतकाच वेगाने प्रसार होणारा आहे. पण अद्याप यावर जागतिक आरोग्य संघटना अभ्यास करत आहे.
त्याचे कोणतेही बाधित नव्याने कुठे आढळलेले नाहीत. त्यामुळे अद्याप त्यावर काळजी करण्याची आवश्यकता नाही, असंही टोपे यांनी सांगितलं.