Friday, July 1, 2022

मोदी सरकारकडून मोठं सरप्राईज मिळण्याची शक्यता

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:देशाचा अर्थसंकल्प उद्या मांडण्यात येणार आहे. महागाईपासूनपासून दिलासा मिळावा, कर सवलत मिळावी अशी अपेक्षा सर्वसामान्यांना आहे. प्राप्तिकरातून सूट मिळावी अशी आशा नोकरवर्गाला आहे.

मोदी सरकारनं अनेकदा आश्चर्यचकीत करणारे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे नोकरदार वर्गाला दिलासा देण्यासाठी सरकार करात सवलत देईल अशी अपेक्षा आहे.अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या अर्थसंकल्प सादर करतील. त्यांचा हा चौथा अर्थसंकल्प असेल.

प्राप्तिकरात सवलत देण्याची मागणी नोकरदार वर्गाकडून होत आहे. यंदा ही मागणी पूर्ण होईल अशी आशा आहे. यंदा सरकार कराच्या टप्प्यात बदल करून करदात्यांना दिलासा देईल, असं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

सर्वसामान्यांना कर सवलत देण्याबद्दलचा शेवटचा निर्णय ८ वर्षांपूर्वी घेण्यात आला आहे. मोदी सरकारनं २०१४ मध्ये प्राप्तिकरातील सवलतीची मर्यादा २ लाखांवरून २.५ लाखांवर नेली.

त्यावेळी अरुण जेटली अर्थमंत्री होते. वयाची साठी ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेली कर सवलतीची मर्यादा २.५ लाखांवरून ३ लाख करण्यात आली होती. जाणकारांच्या अंदाजानुसार, यंदाच्या अर्थसंकल्पातून मोदी सरकार

करदात्यांना मोठा दिलासा देऊ शकतं. सध्या २.५ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त आहे. ही मर्यादा आता ३ लाखांवर नेली जाऊ शकते. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी हीच मर्यादा ३ लाखांवरून ३.५ लाख केली जाण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!