माय महाराष्ट्र न्यूज:गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये मोठी वाढ होत असताना एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता तुम्हाला एलपीजी सिलिंडर स्वस्तात मिळू शकतो. देशातील सरकारी
तेल कंपनीने ग्राहकांसाठी एक चांगला पर्याय आणला आहे. ज्यामध्ये तुम्हाला गॅस सिलेंडर स्वस्तात म्हणजेच फक्त 633 रुपयांमध्ये मिळेल.गॅसच्या वाढल्या दरवाडीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागत आहे. सध्या देशात
गॅस सिलेंडरच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अशा परिस्थितीत इंडेन तुम्हाला फक्त 633 रुपयांमध्ये गॅस सिलेंडर देत आहे. इंडेन ने आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी कंपोझिट सिलेंडर आणले आहे. हा सिलेंडर तुम्ही फक्त 633.5 रुपयात घेऊ शकता.
याशिवाय हे सिलेंडर तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज हलवू शकता. जर तुमचे कुटुंब लहान असेल तर तुमच्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो. कंपोझिट सिलेंडर हे वजनाने हलके असतात आणि तुम्हाला त्यात 10 किलो गॅस मिळतो.
यामुले या सिलेंडरची किंमत कमी आहे. या सिलेंडरचे वैशिष्ट्य म्हणजे ते पारदर्शक आहेत.