माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील गुंजाळे गावात गोळीबार झाला असून गावठी कट्यातुन गोळी झाडुन एकाची हत्या करण्यात आली आहे. यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
प्रदिप एकनाथ पागिरे असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.राहुरी पोलिस घटना स्थळी दाखल. झाले असून घटनेची माहिती घेत आहेत.
दरम्यान गोळीबारा नंतर युवकाला तातडीने नगर मध्ये एका खाजगी रुग्णालयात नेले मात्र तो मृत झाला असल्याचे सांगण्यात आले, अशी माहिती मिळत आहे. त्यानंतर मृत युवकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे.
घटनेचे कारण अस्पष्ट असून एक संशयित पोलीसाच्या ताब्यात असल्याचे समजते, पोलिसांनी अजून याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही मात्र पूर्ववैमनस्यातून सदर प्रकार घडला का याची माहिती घेतली जात आहे.