Sunday, June 4, 2023

संघर्षमय व उमद नेतृत्व नानासाहेब बच्छाव 

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
takshashila pravesh dene surur2
previous arrow
next arrow
Shadow
spot_img

माय महाराष्ट्र न्यूज नेवासा:सर्व सामान्य माणसाला किंवा व्यक्तीला राजकारणात यश मिळत नाही असे अनेक लोक बोलतात पण हेच वाक्य खोट ठरवलं ते नानासाहेब बच्छाव यांनी अलीकडेच

बीआरएस चे राष्ट्रीय अध्यक्ष तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे आदेशावरुन भारत राष्ट्र किसान समिती महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष माणिक दादा कदम यांनी नानासाहेब बच्च्छाव यांची भारत राष्ट्र किसान समिती उत्त महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

खर तर नाशिक जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील नांदगाव तालुक्यातील हिंगणेदेहरे गावचे भुमिपुञ नाना बच्छाव, कोणत्याही प्रकारचे राजकिय पार्श्वभूमी नसलेल्या नानांचे नाव श्री नानासाहेब ऊत्तमराव बच्छाव. त्यांचा वडीलोपार्जित शेती हाच व्यवसाय.

शेतकरी, कष्टकरी व्यथा ज्ञात आसणारे नानांचा शेतकऱ्यांचे हक्कासाठी चा लढा सुरवातीपासुन सुरु होता. मनात नेहमी गोरगरीबांचे कल्याणाची आस, अन्याय अत्याचाराविरोधात चीड, शेतकऱ्यांबद्दलची आपुलकी म्हणून ते आपल काम बाजुला ठेवत आत्महत्याग्रस्त कुटुंबाना

भेटि देवून मदतीचा हात देत आणि आजहि देत आहेत, नाशिक जिल्ह्यातील ईगतपुरी तालुक्यातील शेतकरी नेते, माजी आमदार मा.पुंजाबाबा गोवर्धने यांच्या विचारांवर प्रभावित होऊन शेतकरी चळवळीत सक्रिय सहभाग नंतर रामशेज गडाचे पायथ्याशी शिवकार्ये गडकोट संवर्धन संस्थेचे संस्थापक

अध्यक्ष श्री रामजी खुर्दळ सरांची भेट, शिवकार्ये गडकोट संवर्धन अनेक मोहिमांना हजेरी, मग ईथुनचा सुरु झाले. सम कल्याणकारी विचारातुन “शेतकरी वाचवा अभियान” नानांनी हे अभियान नाशिक जिल्ह्यात सुरवातीलाच जोमान सुरु केले. मग त्याचे लोन देशभर पसरले. अनेक देशभरातील चळवळीतील लोकांचा संपर्क वाढत गेला..

अभियानात काम करतानांचा आविस्मरणीय एक अनुभव असा अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनी भाव मिळत नसल्यामुळे थेट कांदा नाशिक शहरात विक्रीसाठी आणला आसतांना नाशिक महानगरपालिका कर्मचाऱ्यांकडून ञास दिला जात आसतांना हि माहिती मिळताच

 मी व नानासाहेब घटनास्थळी जावून शेतकरी यांचे सोबत रस्त्यावर कांदा विकू लागलो, नाना सोबतीला असतांना कोण्हीही आडवा आला नाही, आम्ही खंबीरपणे शेती माल शेतकऱ्यांचा रस्त्यावर विकला. आणि थेट महापालिकेत जावुन आयुक्त कृष्ना याना भेटून

शेतकऱ्यांचे थेट शेतीमाल विक्रीसाठी राखीव जागांची मागणी केली, तिचा पाठपुरावा केला,थेट शेतात वस्तीत, गावात शेतकऱ्यांनो मरायच नाही आम्ही सोबत आहोत हा शब्द दिला.

सुरवातील शेतकरी वाचवा अभियानाची पत्रके छापुन गावोगावी ठिकठिकाणी वाटली, कर्जाला वैताकुन पुण्यावरून नाशिकला निघून आलेला शेतकऱ्याबाबतची माहिती मिळताच नानांना सोबत घेवून गोदातीरावर संबधित शेतकरी यांना गणवेशावरुन शोधले.

त्या शेतकरी दादाची समजून घालुन त्याला घरी पाठवले. त्या शेतकऱ्याचे घरिही जावून नानांनी सर्व कुटुंबाला धीर दिला. त्या शेतकरी कुटुंबाला दम देणाऱ्याचे तोंड बंद केले. अशी मोहीम निरंतर होती. महाराष्ट्र शासनाने हाती घेतलेल्या समृद्धी महामार्गातील मुळ जमिनदार शेतकऱ्यांना आधार दिला. आंदोलनात झोकून दिले.

त्यानंतर शेतकरी आत्महत्या थांबवया म्हणून रामजी खुर्दळ व ईतर सहकारी यांचे बैठकीत शेतकरी हेल्पलाईन सुरु करण्याचा निर्णय झाला. मग नानांनी २० हजार पत्रके जिल्हाभर फिरून स्वखर्चाने बस स्थानके, ग्रामपंचायत कार्यालय , तलाठी कार्यालय, गावागावात, मराठा क्रांती मोर्चात

लावली – वाटली. अन सुरू झाला हेल्पलाईन फोनचा धडाका. शेतकरी संप सुरू असताना जिल्हाभर शेतकरी हक्कासाठी जन जागृती केली. जिल्हाभर बाजार समित्यांमध्ये जावून प्रबोधन केले. मार्केटमधील आंदोलनात झोकून देत नाना आंदोलनात रात्रंदिस भिडले..त्या शेतकरी संपानंतर शेतकरी प्रश्न बरेच जगासमोर आले..

अडचणीतील, कर्जबाजारी शेतकऱ्यांचे फोन यायला लागले नाना व आम्ही सर्व सहकारी गावागावात पोहोचून त्या शेतकऱ्यांचा आधार बनलो प्रत्येक अडचण शेतकऱ्यांची सोडवण्यात आम्ही प्रत्येक प्रयत्नाने त्या शेतकऱ्यास आधार दिला. कित्येकांच्या

सावकाराच्या ताब्यातील जमिनी सोडवल्या. यासाठी सर्व पर्याय वापरले. शेतीचे वाद मिटवले. अश्या कित्येकांना नानांनी मरणाच्या दारातून बाहेर काढले. नानांची आम्हाला साथ भक्कम होती. आम्ही सगळे घरच्या अडचणीत असतांनाही आम्ही झोकून अभियान चालवीत होतो..

नानांचा सहवास खूप मोलाचा होता,नानांसारखा संवेदनशील,शेतकऱ्यांसाठी जीवाचे रान करणारा, इमानी, प्रसंगी स्वतःला झोकून देणार व्यक्तिमत्व सोबत असल्याने लढा अखंड धगधगत राहिला तो आजवर तसाच अन् त्याच ताकदिन या चळवळीतील आमचे सोबतीला मा.राम खुर्दळ ,राजु देसले, रामजी निकम,रामजी निकम,

ॲड. सुरेंद्र सोनवणे सर, ॲड. प्रभाकर वायचळे, कचरु वैद्य, संदिप खुटे, अंकुश थोरे, कपिलजी गोवर्धने, गणेशजी जाधव, मनोज जाधव, बाबा सोनवणे, एकनाथ सावळे,दत्तुभाऊ चव्हाण,राहुल बिर्हाडे, व इतरही सहकारी या सर्वांचीच सदैव साथ सदैव मिळत गेली.

नानांनी हे शेतकरी वाचवा अभियान सर्वांचे सोबतीन गावागावात पोहचवून समविचाराची तरुण वैचारिक लोक संघटित केली, शेतकऱ्यांना प्रबोधन ते समुपदेशन यासाठी गावागावात दौरे करुन मग प्रश्न कोणताही तीथच अडचण सोडवल्या. या सर्व कृतीशिल

शेतकऱ्यांचे लढ्यातील योगदानातुन पुढे स्वाभिमान शेतकरी संघटचे युवा प्रामाणिक नेतृत्वाखाली हंसराज वडघुले सारख्या क्लास वन पदाची नोकरी सोडणा-या आणि शेतकरी चळवळ मजबूत करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बरोबर काम करायला सुरुवात करत युवा

जिल्हाध्यक्ष पदाची धुरा हाती घेतली. तसेच सुरवातीपासुन अनेक सामाजिक संघटनांचे सभासद, पदाधिकारी असून त्यांनी स्वताची लोकसमाश्रय संस्थाही स्थापन केली आहे.शेतकऱ्यांचे हक्काचे लढ्यात शेतकरी संपातील किसान क्रांती,

सुकाणु समिती त्यांत महत्त्वपुर्ण योगदान, स्वाभिमानीचे व्यापक दुध आंदोलनात सेट्रल जेलची सजा, ईतरही लढ्यात, आंदोलना वेळी खोटे गुन्हे आरोप पण तरीही सातत्याने मार्गक्रमन करत नानांचे अखंड काम आजही चालू आहे. यानंतर त्यांनी

स्वाभिमानी तुन बाहेर पडत शेतकरी संघर्ष संघटनेचा विस्तार व व्यापक कार्ये वाढवले. धाडसी, निर्भिड व हजर जबाबी सडेतोड व्यक्तीमत्व जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्याची तळमळ यामुळेच महाराष्ट्रभर विचारांसह मैञीचा गोतावळा निर्माण झाला आहे.

नानांचे वैचारिक थोर पुरुषांचे विचाराशी साम्यता याचा नेहमी अभिमान असतो.याच प्रत्यय अनेकदा आलेल्या संकटावेळी आपणही अनुभवले असेलच, पिडिताची ओळख असो वा नसो पण मी मदत करणार हे शब्द नानांचे सत्यात अनुभवले.

गावचे विकासाची कास मनी असणारे नानांनी आपले सरपंच कारकिर्तीत अल्पावधितच मोलाचा ठसा उमठवला, गावचे शेतकऱ्यांचे पाण्याच्या प्रश्नावर त्यांचा लढा आजही सुरु आहे. अनेकदा शेतकऱ्यांचे अडिअडचणींचे प्रश्नांवर आंदोलन छेडत नानांनी न्याय मिळवून दिला.

अशी सामाजिक बांधिलकी जपणारे तसेच शेती, मातीशी सत्यनिष्ठ कर्माशी नात ठेवणारे नानांना बीआरएस कडून भारत राष्ट्र किसान समिती उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पद मिळाले याचा मला व सर्व सहकारी सोबती यांना नक्कीच सार्थ अभिमान आहे…

ज्यांनी ह्या पदासाठी योग्य कृतिशिल व्यक्तींची निवड करुन जबाबदारी दिली ते आमचे शेतकरी चळवळीतील आत्महत्या थांबण्यासाठी दिवसराञ झडपडणारे, चळवळीतील मार्गदर्शक मा. श्री माणिक दादा कदम यांनी हा जबाबदारचा बहुमान दिला दादांचे सदैव ज्ञृन व आभार व्यक्त करतो…..

चला मिञहो नानांचे हे शेतकरी कल्याणकारी कार्याला हातभार लावून नानांचे हात बळकट करुनु बीआरएस चे संघटन गावागावात पोहचवून “अबकी बार किसान सरकार” हा नारा बुलुंद करुया…नानांना मिळालेल्या ह्या मोठ्या जबाबदारीला मनपुर्वक खुप-खुप शुभेच्छा …..

✍.प्रकाश ञ्यंबक चव्हाण

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!