Sunday, July 3, 2022

खूशखबर!12 वी पास असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी; तब्बल इतक्या जागांसाठी भरती

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने आयओसीएल अप्रेंटीस उमेदवारांच्या भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. आयओसीएल अप्रेंटिस भरती 2022 साठी ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत.

इच्छुक आणि पात्र उमेदवार IOCL च्या अधिकृत वेबसाईट iocl.com वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. पात्र उमेदवारांची लेखी चाचणीद्वारे निवड केली जाईल.IOCL ने गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा आणि दादरा-नगर

हवेली येथे 500 हून अधिक अप्रेंटिस भरतीसाठी ही मोहीम सुरू केली आहे. पात्र उमेदवार 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अप्रेंटिस ट्रेनिंग कालावधी हा एक वर्षाचा असेल.

उमेदवारांनी रिजनल डायरेक्टरेट ऑफ अप्रेंटिसशिप कडे ट्रेड अप्रेंटिस म्हणून ऑनलाइन नोंदणी करावी किंवा बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग मध्ये टेक्निशिअन अप्रेंटिस म्हणून ऑनलाइन अर्ज करावा.

कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण मंडळ किंवा संस्थेतून बारावी परीक्षा उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय डिप्लोमा प्राप्त केलेले उमेदवार अर्ज करू शकतात. बीई, बीटेक, एमसीए, एलएलबी आणि इतर

उच्च शैक्षणिक पदवी असलेल्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे जाहीर केलेल्या अधिसूचनेत स्पष्टपणे म्हटले आहे.पात्र अर्जदारांचे वय 31 जानेवारी 2022 रोजी किमान 18 वर्षे आणि कमाल

24 वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. अधिक तपशीलांसाठी सूचना काळजीपूर्वक वाचा.ट्रेड आणि टेक्निशियन शिकाऊ उमेदवारांना स्टेशनरी, वाहतूक आणि विविध

खर्चासाठी 2500 रुपयांच्या अतिरिक्त रकमेसह प्रशिक्षणार्थी नियमांनुसार एकत्रित स्टायपेंड दिले जाईल. एकत्रित वेतन विशिष्ट ठिकाणी लागू असलेल्या किमान वेतनामधील अद्ययावत सुधारणांच्या अधीन आहे.अर्जदारांची लेखी चाचणी (अवधी 90 मिनिटे),

कागदपत्रे पडताळणी आणि इतर पात्रता निकषांची पूर्तता या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल. लेखी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होईल ज्यामध्ये 100 ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टीपल चॉईस क्वशन (MCQ) विचारले जातील. एका हिदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

गुजरात – 121 पदे

महाराष्ट्र – 322 पदे

मध्य प्रदेश – 80 पदे

छत्तीसगड – 35 पदे

गोवा – 8 पदे

दादरा आणि नगर हवेली – 4 पदे

एकूण रिक्त पदांची संख्या – 570

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!