माय महाराष्ट्र न्यूज:-बारावीच्या परीक्षा जवळपास महिनाभरावर येऊन ठेपल्या आहेत. या परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन, याबाबत अजूनही संभ्रम कायम आहे.
मात्र कोरोनाचा धोका पूर्णपणे टळला नसल्यानं यंदा झिगझॅग संकल्पनेनुसार परीक्षा घेण्याचा विचार सुरू झाला आहे.यंदा दहावीला 16.23 लाख, तर बारावीसाठी 14.70 लाख विद्यार्थी बसले आहेत.
या परीक्षांसाठी शाळा तिथं परीक्षा केंद्रे असतील, एका वर्गात झिगझॅग पद्धतीनं 25 विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था असेल. राज्यभरात अशी जवळपास 31 हजार परीक्षा केंद्रे असतील. उन्हाळा आणि नंतर पावसाळा असल्यानं जाहीर वेळापत्रकानुसारच परीक्षा होतील
दहावी-बारावी परीक्षा ऑनलाईन घ्याव्यात, असाही काही विद्यार्थ्यांचा आग्रह आहे. तर परीक्षा महिनाभर पुढं ढकलाव्यात, अशी देखील काही विद्यार्थी-पालकांची मागणी आहे.
मात्र वेळेत परीक्षा घेऊन वेळेवर निकाल जाहीर करण्याचा एसएससी आणि एचएससी बोर्डाचा सध्या तरी विचार दिसतोय. याबाबत नेमका काय अंतिम निर्णय होतो, याकडं राज्यभरातल्या विद्यार्थी-पालकांचं लक्ष लागलं आहे.