भेंडा
भेंडा येथील प्रा.डॉ.अश्विनी देशमुख-उगले या सेट परिक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत.
डॉ.देशमुख-उगले या जनता शिक्षण प्रसारक मंडळ दहिगांवने येथील लोकनेते मारूतराव घुले पाटील महाविद्यालयात कार्यरत आहेत. युजीसी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक पदासाठी या परीक्षा (सेट) घेण्यात आल्या होत्या, या राज्यस्तरीय पात्रता परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्यामध्ये प्रा.डॉ.अश्विनी देशमुख-उगले यांनी अर्थशास्त्र विषयात यश संपादन केले आहे.
त्यांच्या यशाबद्दल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आ. नरेंद्र घुले पाटील, संस्थेचे सचिव माजी आ. चंद्रशेखर घुले पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा ना.सौ. राजश्रीताई घुले पाटील, शेवगांव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितीज घुले पाटील, संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य डॉ. शरद कोलते, प्रा.खरात, समन्वयक प्रा. नजन, अहमदनगर येथील हायस्कूलच्या प्राचार्या सौ.शितल बांगर, भेंडा येथील जिजामाता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामकिसन सासवडे, उपप्राचार्य डॉ. संभाजीराव काळे, श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी भारत वाबळे,सासरे अशोकराव उगले तसेच जनता प्रसारक शिक्षण संस्थेतील सर्व प्राध्यापक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षकवृंद व कर्मचारी वर्ग यांनी त्यांचे अभिनंदन केले.