नेवासा
नेवासा तालुक्यातील म्हसले येथे अंगावर वीज पडून १० वर्षीय शालेय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना आज शुक्रवार दि.२८ एप्रिल रोजी दुपारी १२:१५ वाजेच्या सुमारास घडली.
आज शुक्रवार दि.२८ रोजी सकाळी ११:३० ते १२:१५ यावेळेत नेवासा तालुक्यात वीजच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. पाऊस सुरु होण्याचे दरम्यान सकाळी १२:१५ वाजेच्या दरम्यान घराच्या सोबत शेतातील कांदा झाकण्यासाठी गेलेल्या साई उर्फ बहीरुनाथ राजेंद्र शिरसाठ (वय १० वर्षे ) या इयत्ता ४ थी मध्ये असलेल्या शालेय विद्यार्थ्याचे अंगावर कडकडणारी वीज पडली, त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यु झाला. त्याचा मृत्युदेह नेवासा फाटा येथील ग्रामिण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी आणण्यात आला आहे.
या दुर्देवी घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.