Saturday, July 2, 2022

अश्लिल व्हिडीओ बनवुन व्हायरल करुन नगरसेवकाची बदनामी करणाऱ्या आरोपीस नेवासा पोलीसांकडुन अटक

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा शहरातील प्रतिष्ठीत व्यक्तीचा चेहरा वापरून अश्लिल व्हिडीओ बनवुन व्हायरल करुन नगरसेवकाची बदनामी करणाऱ्या आरोपीस नेवासा पोलीसांनी अटक केली आहे.

याबाबद अधिक माहिती अशी की, नेवासा शहरातील प्रतिष्ठीत नगरसेवक यांचा चेहरा वापरुन त्यास अश्लिल हावभाव करणारे व्हिडीओ तयार करुन ते व्हॉट्सअॅपद्वारे व्हायरल करुन फिर्यादीची बदनामी केली होती. सदर बाबत नेवासा पोलीस स्टेशन गुरनं 994/2021 माहीती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम-67,66-C, 67-A सह भादवी 292 प्रमाणे गुन्हा रजिस्टरी दाखल करण्यात आलेला आहे.गुन्हा घडले पासुन आरोपी हा त्याचे अस्तित्व लपवुन फिरत होता.

आरोपीच्या वास्तव्याबाबत अपर पोलीस अधिक्षक यांचेकडील सायबर टीमच्या मदतीने तांत्रिक पुराव्या अनुषंगाने निष्पन्न आरोपी निखील रविकिरण पोतदार (वय 27 वर्षे) मु.रा.नांदेड ह.रा-सदाशिव पेठ पुणे यास फरासखाना पोलीस स्टेशन पुणे यांच्या मदतीने ताब्यात घेवुन नमुद गुन्ह्यात अटक करण्यात आली असुन आरोपीतास मा न्यायालयात हजर केले असता मा न्यायालयाने आरोपीतास दि.07 फेब्रुवारी 2022 पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजुर केली आहे.

सदरची ही कामगीरी पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल, अपर पोलीस अधिक्षक स्वाती भोर, श्रीरामपुर, उप विभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे , पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि माणिक चौधरी, पोसई समाधान भाटेवाल, पोना अशोक कुदळे, पोकॉ अंबादास गिते, केवल रजपुत, यांचेसह अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपुर यांचेकडील सायबर टीमचे पोना फुरकान शेख तसेच फरासखाना पोलीस स्टेशन पुणे येथील सफौ रिजवान जिनेडी, पोकॉ रुषिकेश दिघे यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!