Thursday, June 30, 2022

जबरी चोरी करणाऱ्या आरोपीस नेवासा पोलीसांकडुन मुद्देमालासह अटक

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

जबरी चोरी करणाऱ्या आरोपीस नेवासा पोलीसांनी मुद्देमालासह अटक केली आहे.

याबद्दल ची अधिक माहिती अशी की,फिर्यादी ज्ञानदेव यशवंत बर्डे रा.भातकुडगाव ता-शेवगाव हे दि.17 ऑक्टोबर 2021 रोजी कामानिमित्त पाचेगाव येथे आले होते. तेथुन भातकुडगाव ता-शेवगाव येथे जाण्यासाठी सायंकाळी 7 वा सुमारास नेवास बस स्टॅण्ड समोर गाडीची वाट बघत असतांना यातील आरोपीत मा यांनी त्यांना लिप्ट देवुन नेवासा फाटा येथे जात असतांना काझीनगर येथे फिर्यादीस बळजबरी घेवुन जावुन चॉपर लावुन फिर्यादीकडील रोख रक्कम व मोबाईल असा एकुण 19 हजार 500 रुपये किंमतीचा ऐजव बळजबरीने चोरुन नेला होता. सदरप्रकाराबाबत नेवासा पोलीस स्टेशन गुरनं 790/2021 भादवी 392 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवुन पोलीस अधिक्षक, अपर पोलीस अधिक्षक अहमदनगर,अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपुर, उप विभागीय पोलीस अधिकारी शेवगाव यांनी गुन्हा तपासाच्या अनुषंगाने सुचना दिल्या होत्या. गुन्हा घडले पासुन आरोपी हा त्याचे अस्तित्व लपवुन फिरत होता.

अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपुर यांचेकडील सायबर टीमच्या मदतीने तांत्रिक पुराव्या अनुषंगाने निष्पन्न आरोपी रॉकी रमेश चांदणे वय 23 वर्षे रा-लक्ष्मीनगर नेवासा त्यांचे राहते घरातुन ताब्यात घेवुन नमुद गुन्ह्यात अटक करण्यात आली असुन गुन्ह्यात चोरीस गेला फिर्यादीचा मोबाईल आरोपीताच्या ताब्यातुन जप्त करण्यात आला असुन आरोपीतास मा न्यायालयात हजर केले असता मा न्यायालयाने आरोपीस दि.07 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजुर केली आहे.

सदरची कामगीरी ही पोलीस अधिक्षक मनोज पाटील , अपर पोलीस अधिक्षक सो सौरभ अग्रवाल, अपर पोलीस अधिक्षक सो स्वाती भोर, उप विभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे , पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि माणिक चौधरी, सपोनि ज्ञानेश्वर थोरात, पोना भागवत शिंदे, पोकॉ अंबादास गिते यांचेसह अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपुर यांचेकडील सायबर टीमचे पोना फुरकान शेख यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!