नेवासा
समाजामध्ये जातिवाद व धर्मांधता काही पक्षाकडून अधोरेखित केली जात आहे. त्यामुळे देशाच्या विकासाच्या गतीवर परिणाम होत आहे. तथापि राष्ट्रवादी हा सर्वधर्म जाती-धर्माला बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनानुसार पुढील वाटचाल करण्यासाठी राष्ट्रवादी विचार समाजापर्यंत पोहोचविणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अभंग यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने “एक तास राष्ट्रवादीसाठी,आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रभावी, प्रगल्भ, तरुण,पुरोगामी विचारांसाठी” या उपक्रमांतर्गत विचाराचे धन वाढविण्याच्या दृष्टीने वैचारिकदृष्ट्या मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये शहरामध्ये मध्ये महिन्याच्या पहिल्या शनिवारी कार्यकर्त्यांनी आपल्या जन्म गावी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते बोलावून बैठक घ्यावी असे आदेश प्रदेश पातळीवरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना देण्यात आलेले आहेत.
त्यानुसार पहिली चिंतन बैठक नेवासा तालुक्यातील भेंडा येथे दि. 5 फेब्रुवारी 2022 रोजी प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडली.
यावेळी बोलतांना राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काशिनाथ नवले म्हणाले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या तत्व प्रणाली प्रमाणे विचारांची लढाई विचाराने लढणे ही काळाची गरज आहे असा आग्रही विचार मांडला.
यापुढील काळात समाजामध्ये जाऊन विधायक व रचनात्मकत तसेच सामाजिक ऐक्य व समरसता टिकविण्यासाठी राष्ट्रवादी पक्ष नेटाने कार्य करेल. त्यासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसली पाहिजे असे आवाहन डॉ. अशोकराव ढगे यांनी केले.
राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस गणेश गव्हाणे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. अशोकराव ढगे,तुकाराम मिसाळ,संचालक अशोकराव मिसाळ, शिवाजीराव कोलते,रामकृष्ण नवले,सुनील गव्हाणे,राजेंद्र चिंधे,बाळासाहेब वीर,संजय फुलमाळी यांचेसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.