Sunday, July 3, 2022

राज्य उत्पादन शुल्क विभागाची मद्यार्क तस्करी विरोधात धडक कारवाई;45 लाखांचा मुद्देमाल जप्त

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

अहमदनगर

राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्यार्क तस्करी विरोधात धडक कारवाई करून टँकरमधील मद्यार्क चोरी होत असताना मद्यार्काने भरलेला टँकर व पिकअपसह 45 लाख 11 हजार 360 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबद अधिक माहिती अशी की,दि.6 रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत परराज्यातील महाराष्ट्राच्या हद्दितून जाणारे टँकर तपासणी करत असताना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार मध्यप्रदेश येथून केरळ राज्यात मद्यार्क घेऊन जाणारे टँकर तपासणी करत असताना हॉटेल जम्मू हिमाचल पंजाबी चौधरी धाबाच्या पाठीमागील मोकळ्या जागेत नगर मनमाड रोड लगत देवळाली प्रवरा शिवार तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर या ठिकाणी टँकर क्रमांक MP 09 HH7648 या टॅकरमधून मद्यार्क टँकरचे झाकण उघडून पाइपच्या साहाय्याने पिकअप मध्ये असलेल्या 35 लिटर क्षमतेच्या प्लास्टिक कॅनमध्ये पाइपच्या सहाय्याने काढलेले एकूण 280 लिटर मद्यार्क पिकअप मध्ये आढळून आले. सदर पिकअपचा क्रमांक MH 12 LT 40 47 असा आहे. सदर ठिकाणी आरोपी टँकर चालक मालक व पिकअप चालक-मालक इ. अंधाराचा फायदा घेत फरार झाले आहेत.
सदरील टँकर हा ओअसिस डिस्टिलरी लिमीटेड धार मध्यप्रदेश येथून युनायटेड डिस्टिलरीज केरळ येथे चाललेला होता सदर टॅकरमध्ये 30000 लिटर अति शुद्ध मद्यार्क ENA असल्याची कागदपत्रावर नोंद असून टँकरचा आयात व निर्यात परवाना आहे परंतु सदर टँकर मधील अतिशुद्ध मद्यार्क ची मोजदाद केली असता मद्यार्क टँकर मध्ये तफावत असल्याचे दिसून आले म्हणजेच आयात निर्यात परवाना असलेल्या टॅकरचे सील तोडून मद्यार्क काढण्यात आले सदरील मद्द्यार्क हे बनावट मद्य व हातभट्टी गावठी दारू मध्ये मिश्रण करण्यासाठी वापरण्यात येणार असल्याची शक्यता होती. सदर कारवाई मध्ये दोन वाहनांसह 45,11,360/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर पळून गेलेल्या इसमा विरुद्ध मुंबई दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, अंमलबजावणी व दक्षता संचालक वर्षा वर्मा, पुणे विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे,अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अहमदनगर गणेश पाटील यांचे मार्गदर्शनाखाली उपाधिक्षक
नितेश शेंडे, निरीक्षक अनिल पाटील,श्रीरामपूर भरारी पथक क्रमांक 2 चे निरीक्षक गोपाल चांदेकर,निरीक्षक संजय कोल्हे, दुय्यम निरीक्षक के यु छत्रे, नंदू परते व अजित बडदे सहाय्यक दुय्यम निरीक्षक सर्वश्री के के शेख, आर बी कदम व नारायण तुबे जवान सर्वश्री पी पी साळवे, बी के नागरे व बी बी करंजुले महिला जवान श्रीमती एस आर फटांगरे, वाहन चालक नि जवान श्री विपुल करपे, सुशांत कासुळे व दीपक बर्डे इ. यांनी सदर कारवाई मध्ये भाग घेतला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास श्रीरामपूर भरारी पथकाचे निरीक्षक गोपाल चांदेकर हे करत आहेत

 

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!