Saturday, July 2, 2022

जन्मदात्याचा दगडाने ठेचून खून;मुलाला अटक

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

गंगापूर | दत्तात्रय जोशी

आईच्या मृत्युला बाप जबाबदार असल्याचा संशयाच्या भुत डोक्यात घुसलेल्या चोवीस वर्षीय मुलाने बापाचा ठेचून खून केला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून आरोपी मुलाला पोलीसांनी बेड्या ठोकल्या.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वाळूज पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गंगापुर तालुक्यातील दहेगाव बंगला येथील आरोपी अनिल कडुबा सोनवणे (वय 24 वर्षे) याच्या आईचा काही दिवसापूर्वी जळून मृत्यू झाला. याला बापच कारणीभूत असल्याचा राग मनात धरून जन्मदात्या बापाचा खून केल्याची घटना घडलीय. दहा वर्षापूर्वी कडुबा सोनवणे यांच्या पत्नीने घरगुती वादातून स्वतःला जाळून घेऊन आत्महत्या केली होती. तेव्हापासून कडुबा मुरलीधर सोनवणे आपल्या दोन मुलांसह अनिल सोनवणे (वय 24 वर्षे) ,आणि सुनील सोनवणे (वय 28 वर्षे) यांच्यासोबत आपला प्रपंच चालवत होते. मात्र मुलगा अनिल सोनवणे हा आपल्या आईने केलेल्या आत्महत्येची राग मनात ठेवून वडिलांसोबत नेहमीच वाद घालायचा. यापूर्वीसुद्धा आरोपीने वडिलांसोबत भांडणे करून वडिलांचा काटा काढण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेऊन आरोपीस समजून सांगितले होते.

परंतु ५ फेब्रुवारी रोजी मुलांचा व वडिलांचा वाद विकोपाला गेल्याने मुलाने रागाच्या भरात आपल्या जन्मदात्या बाप कडुबा सोनवणे (वय 55 वर्षे) यांचा शनिवारी रात्री दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आला. सदर घटना सकाळी उघडकीस येताच घटनास्थळी वाळूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन इंगोले सहाय्यक पोलिस अधिकारी लक्ष्मण उंबरे सहाय्यक पोलिस अधिकारी विनायक शेळके यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस आयुक्त उज्ज्वला वनकर यांनी घटनास्थळाची पाहणी करून आरोपीला ताब्यात घेतले. या प्रकरणी आरोपींचा भाऊ सुनील सोनवणे यांच्या फिर्यादीवरून अनिल विरोधात वाळुंज पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स पो नी विनायक शेळके हे करत आहे.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!