माय महाराष्ट्र न्यूज:पोस्ट ऑफिसमधील योजना ही आजदेखील अनेकांसाठी पहिली पसंती असते. देशातील पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूक योजनेवर गुंतवणूकदारांचा मोठा विश्वास आहे. पोस्ट ऑफिस सर्वसामान्य गुंतवणुकदार आणि ग्राहकांसाठी
अनेक प्रकारच्या योजना घेऊन येत असते. या योजनांमध्ये तुम्हाला निश्चित परतावा मिळतो. शिवाय भांडवलाची सुरक्षिततादेखील असते. पोस्ट ऑफिसची एक अशी योजना आहे, ज्या अंतर्गत तुमचे पैसे दुप्पट
केले जातील. ही जबरदस्त योजना म्हणजे किसान विकास पत्र पोस्ट ऑफिसद्वारे ऑफर केलेल्या किसान विकास पत्र योजनेद्वारे गुंतवणूकदार त्यांचे पैसे 10 वर्षांपेक्षा थोड्या जास्त कालावधीत दुप्पट करू शकतात.
या अल्पबचत योजनेद्वारे, तुम्ही तुमचे पैसे 124 महिन्यांत म्हणजे 10 वर्षे आणि चार महिन्यांत सध्याच्या व्याजदराने दुप्पट करू शकता.सध्या, किसान विकास पत्रावर वार्षिक ६.९ टक्के चक्रवाढ व्याज मिळते आहे. मॅच्युरिटीच्या वेळी व्याजदर बदलला
असला तरी तुमच्या परताव्यातील बदलाचा कोणताही परिणाम होणार नाही. व्याजदर कमी झाले असले तरीही तुम्हाला निश्चित करून दिलेले म्हणजे तुम्ही गुंतवणूक करत असतानाच्या व्याजदरानुसार अंतिम रक्कम मिळेल. या कारणामुळेच
किसान विकास पत्र हा सर्वात सुरक्षित गुंतवणूक पर्यायांपैकी एक मानला जातो.कोणताही भारतीय नागरिक ज्याचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त आहे, या योजनेत गुंतवणूक करू शकतो आणि हे प्रमाणपत्र खरेदी करू शकतो. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी
कोणतीही कमाल वयोमर्यादा नाही. किसान विकास पत्रात अल्पवयीनांनादेखील गुंतवणूक करण्यास आणि खरेदी करण्यास देखील अनुमती देते. तथापि, त्यांचे खाते प्रौढ व्यक्तीकडे असणे आवश्यक आहे.
केवळ भारतात राहणारे भारतीय नागरिकच किसान विकास पत्र प्रमाणपत्र खरेदी करण्यास पात्र आहेत. हिंदू-एकत्रित कुटुंब किसान विकास पत्र खरेदी करू शकत नाहीत.