Friday, July 1, 2022

सराईत गुन्हेगार व गुन्ह्यातील फरार आरोपीला नेवासा पोलिसांनी केली अटक

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

सराईत गुन्हेगार व गुन्ह्यातील फरार आरोपी अमोल भास्कर शेलार (वय 24 वर्षे) रा. नेवासा फाटा ता. नेवासा यांस अत्यंत शिताफीने व सिनेस्टाईल पाठलाग करुन नेवासा पोलिसांनी ताब्यांत घेतले आहे.

याबाबद अधिक माहिती अशी की,पोलीस ठाणे नेवासा येथे दिनांक 20.02.2021 रोजी फिर्यादी शहाबुद्दीन गुलामवारीस मोहम्मद (वय 21 वर्षे) व्यवसाय चालक रा.गौरागंज जि.अमेठी राज्य उत्तरप्रदेश यांनी फिर्याद दिली की, दिनांक 20.02.2021 रोजी 01.00 वाजण्याचे सुमारास अहमदनगर कडुन औरंगाबादकडे जात असताना उस्थळ दुमाला शिवार ता. नेवासा येथे इंस्सार पेट्रोलपंपाच्या पुढे काही अंतरावर हायवे रोडने जात असताना एक अपाची मोटार सायकल विनानंबर काळ्या रंगाची त्यावर तीन अज्ञात इसमांनी फिर्यादीचे गाडीस गाडी आडवी लावुन गाडी थांबवुन काचा फोडुन फिर्यादीचे गळ्यास चाकु लावून शिवीगाळ दमदाटी मारहान करुन फिर्यादीकडील 12500/- रुपये रोख रक्कम, गाडीतील जॅकेट व 1,000/- रुपये किंमतीचा शुज बळजबरीने चोरुन नेले आहे, म्हणुन फिर्यादी यांची वरील तीन अनोळखी ईसमाविरुध्द कायदेशीर फिर्याद दिली होती. त्या अनुषंगाने पोलीस ठाणे नेवासा येथे गु.र.नं 94/2021 कलम 392, 427, 34 भा.दं.वि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यांत आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास त्तकालीन नेमणुकीस असलेले पोलीस उप निरीक्षक यांनी तपास केला असुन त्यांनी तपासादरम्याण सदर गुन्ह्यांत आरोपी नामे अमर चिल्लु कांबळे (वय 26 वर्षे) रा. नेवासा फाटा ता. नेवासा यांस अटक केली होती व त्याच्याकडून गुन्ह्यातील गेल्या मुद्देमाला पैकी 1300/- रुपये व गुन्ह्यांत वापरण्यांत आलेला चाकु जप्त केला. तसेच सदर गुन्ह्यांत आरोपी नामे अमोल भास्कर शेलार रा.नेवासा फाटा ता. नेवासा व त्यासोबत आणखी एक आरोपी निष्पन्न करुन त्यांच्या विरुध्द मा.न्यायालयांत दोषारोप सादर केले होते.

आरोपी अमोल भास्कर शेलार हा गुन्हा घडल्यापासुन अद्याप पावेतो फरार होता. त्याचा शोध घेण्यासाठी कायम त्याच्या मागावर नेवासा पोलीस ठाणे येथील पोलीस होते परंतु तो त्याचे अस्तित्व लपवुन नेवासा गावातुन फरार झाला होता. अखेर तो दिनांक 10.02.2022 रोजी नेवासा फाटा येथील पायल हॉटेल येथे येणार आहे अशी खात्रीलायक बातमी पोलीस निरीक्षक श्री. बाजीराव पोवार यांना मिळाल्याने त्यांनी त्यांचे अधिपत्याखालील पोलीस उप निरीक्षक श्री. समाधान भाटेवाल, पोलीस अंमलदार अंबादास गिते, गणेश ईथापे, केवलसिंह राजपुत, अप्पासाहेब तांबे यांना कळवुन त्यांचे पोलीस पथक तयार करुन नेवासा फाटा येथील पायल हॉटेल जवळ पाठवून तेथे पोलीस पथकाने सापळा रचुन फरार आरोपी अमोल भास्कर शेलार याची येण्याची वाट पाहत थांबले असता, आरोपी अमोल भास्कर शेलार हा हॉटेलवर जाण्यासाठी रात्रीचे 09.30 वाजण्याच्या सुमारास पायल हॉटेल जवळ आला असता, त्याने आजुबाजूला पाहिले असता, त्याला सदर पथकातील पोलीस अंमलदार यांच्यावर संशय आल्याने त्याने तेथुन पळून जाण्याचा प्रयत्न केला परंत सदर पोलीस पथकातील पोलीसांनी त्याचा सिनेस्टाईल पाठलाग करुन त्यांस ताब्यांत घेऊन त्यांस वर नमुद गुन्ह्यांत अटक केली असून पुढील तपास पोलीस उप निरीक्षक समाधान भाटेवाल हे करीत आहेत. आरोपी अमोल भास्कर शेलार रा. नेवासा फाटा ता. नेवासा याचेवर महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस ठाणेत 7 गुन्हे दाखल आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या अधिपत्या खालील नेमलेल्या पोलीस पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल, पोकॉ अंबादास गिते, पोकॉ गणेश ईथापे, पोकॉ केवलसिंह राजपुत, पोकॉ अप्पासाहेब तांबे यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!