माय महाराष्ट्र न्यूज : शेवगाव तालुक्यातील वृध्द पेन्शन योजना व विविध लाभाच्या योजनांचे हजारो प्रकरणे शासन दरबारी प्रलंबित आहेत, अंत्योदय योजना पात्र लाभार्थींना अवश्यक असलेले रेशनकार्ड मिळत नाहीत
या प्रकरणी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोर्चा काढण्याचा निर्णय भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वडुले खुर्द (ता. शेवगाव ) येथील शाखा परिषदेत घेण्यात आला आहे.भाकपची वडुले खुर्द ( ता. शेवगाव ) येथील पक्ष शाखा परिषदेचे कामकाज ज्येष्ठ
कार्यकर्ते कॉ गहिनीनाथ आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली व भाकपचे राज्य सहसेक्रेटरी कॉ. अॅड. सुभाष लांडे, किसानसभेचे जिल्हा उपाध्यक्ष कॉ. बापूराव राशिनकर, कॉ. संजय नांगरे आदींच्या उपस्थित संपन्न झाले. या वेळी वडुले खुर्द
शाखेच्या सेक्रेटरीपदी कॉ. वैभव शिंदे व सहसेक्रेटरी पदी कॉ. अमोल खोसे यांची पदी निवड करण्यात आली. या वेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या दैदिप्यमान ऐतिहासिक कार्याचे महत्त्व व आजच्या काळातील पक्ष शाखा सक्षम करण्यासाठी शिबिराचे
आयोजन तसेच वृध्द पेन्शन योजना, पात्र लाभार्थींना अंत्योदय रेशनिंग ची सुविधा उपलब्ध व्हावी, घरकुल योजना आदी विषयांवर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले. या वेळी कॉ सुभाष लांडे, बापूराव राशिनकर, संजय नांगरे वैभव शिंदे यांनी विचार मांडले. या वेळी उपस्थित सभासदांना पक्ष कार्ड वाटप करण्यात आले.