Saturday, July 2, 2022

दिवशी प्रकल्पाचे काम दर्जेदार गुणवत्तापूर्ण करण्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे निर्देश

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

मुंबई

नांदेड जिल्ह्यातील दिवशी (बु.) (भोकर) प्रकल्पास 37 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. हा सिंचन तलाव मराठवाड्यातील 251 ते 600 हेक्टर सिंचन क्षमता असणारा मृद व जलसंधारण विभागाचा पहिलाच प्रकल्प असून या सिंचन तलावाचे काम दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करण्याचे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिले.
जलसंधारण मंत्री श्री. गडाख म्हणाले, दिवशी (बु.) सिंचन तलावाची प्रशासकीय व तांत्रिक मान्यतेसह निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून कार्यादेश देण्यात आले आहेत. या तलावाचे काम तात्काळ सुरु करावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.हा प्रकल्प दिवशी परिसरासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. या तलावामुळे दिवशी, कानी व पाकी या गावातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी मोठा दिलासा मिळणार आहे. या सिंचन तलावासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा पाठपुरावा होता, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
जलसंधारण विभागाच्या माध्यमातून राज्यातील सिंचनाच्या अनेक कामांना मंजुरी देण्यात आली आहे. जलसंधारण मंत्री श्री.गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली दिवशी सिंचन तलावासारख्या अधिक सिंचन क्षमतेच्या तलावास मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात येत असून याद्वारे राज्याची सिंचन क्षमता वाढण्यास मदत होणार आहे.

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!