माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील अकोले मतदार संघात 268 कोटीची विकास कामे सुरू आहेत. अनेक गावांना एक एक कोटींचा निधी दिला आहे. अकोले शहराला विकासासाठी 14.5 कोटींचा निधी दिला असे असतानाही अकोले शहराने आमचा पराभव केला.
नगरपंचायत निवडणुकीत धनदांडग्यांनी आपली मते विकली आणि लोकशाहीला अशोभनीय कृत्य झालं, धन दांडग्यानी आपली मतं विकल्याने मला पराभव स्वीकारावा लागला मात्र हा आमचा
पराभव भाजपने नव्हे तर काँग्रेसने केला असा आरोप आमदार डॉ. किरण लहामटे यांनी केला.अहमदनगर जिल्ह्यातील कोतूळ ता. अकोले येथे आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
आमदार डॉ. लहामटे पुढे म्हणाले, अकोले नगर पंचायत निवडणुकीत आमचा पराभव हा काँग्रेसने घडून आला आहे. शहराला 14 कोटीचा निधी दिला. सत्ता दिली असती तर आणखी कामे करत आली असती असे सांगितले. आज तालुक्यात
अनेक विकास कामे चालू आहे. प्रत्येक गावाला आपण न्याय देत आहे. मतदार संघ हे माझे कुटुंब आहे. गावात राजकारण येऊ न देता गुण्या गोविदाने नांदा वाईट गोष्टी बाजूला करून तरुणांनी गावाचा स्वतःचा विकास करा असे सांगत खेळा बरोबरच जीवनाचा आनंद घ्या, असे आवाहन त्यांनी केले.
आमदार लहामटे म्हणाले आमचा पराभव भाजप नाही तर काँग्रेसने केला अकोले मतदार संघात 268 कोटीची विकास कामे सुरू आहेत. अनेक गावांना एक एक कोटींचा निधी दिला आहे. अकोले शहराला विकासासाठी 14.5 कोटींचा निधी दिला
असे असतानाही अकोले शहराने आमचा पराभव केला. नगरपंचायत निवडणुकीत धनदांडग्यांनी आपली मते विकली आणि लोकशाहीला अशोभनीय कृत्य झालं, धन दांडग्यानी आपली मतं विकल्याने मला पराभव स्वीकारावा लागला मात्र हा
आमचा पराभव भाजपने नव्हे तर काँग्रेसने केला असा आरोप आमदार डॉ. किरण लहामटे यांनी केला.